Lokmat Sakhi >Food > पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी

पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी

Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes : पावसाळ्यात करा मस्त पालकाचे चिप्स. करायला सोपे आणि जरा भन्नाट रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 16:56 IST2025-06-19T16:55:41+5:302025-06-19T16:56:31+5:30

Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes : पावसाळ्यात करा मस्त पालकाचे चिप्स. करायला सोपे आणि जरा भन्नाट रेसिपी.

Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes | पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी

पालक चिप्स आणि गरमागरम चहा, पावसाळ्यातलं सुख! पाहा विकतपेक्षा भारी पालक चिप्स करण्याची रेसिपी

बटाटा चिप्स, केळ्याचे चिप्स आपण बरेचदा खातो. काही तरी स्नॅक्स खायची इच्छा झाल्यावर आपण चिप्ससारखे पदार्थ खातो. (Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes )आता विकत स्नॅक्स आणण्यापेक्षा घरीच करा. बटाट्याचे चिप्स करतच असाल एकदा हे पालक चिप्स करुन पाहा. एवढे मस्त लागतात की तुम्ही कल्पनाच करु शकत नाही. टिकतातही अनेक महिने.  

साहित्य 
पालक, मीठ, पाणी, तेल, मैदा, तांदळाचे पीठ, लाल तिखट, चाट मसाला 

कृती 
१. पालकाची छान ताजी जुडी आणायची. पालक स्वच्छ धुवायचा. पालकाची भाजी लगेच साफ होत नाही. त्यामुळे पालकाची निवडलेली पाने पाण्यात भिजत ठेवायची. थोड्या वेळात त्यावरील सगळी माती निघून जाते. पालक धुऊन झाल्यावर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचे. त्यात पालकाची पाने घालायची. देठही घ्या. अजिबात भाजी वाया घालवायची नाही. 

२. पाण्यामध्ये पालक घालायचा आणि छान उकळायचा. पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्याची पाने लगेच शिजतील. पालक शिजल्यावर गॅस बंद करायचा आणि पाणी काढून घ्यायचे. त्या पाण्याचे सूपही करु शकता. चवीला छान लागते. पाणी व पालक वेगळा केल्यावर भाजी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. गार होऊ द्या. 

३. पालक गार झाल्यावर त्याची पातळ पेस्ट तयार करायची. पालक छान वाटून घ्यायचा. त्यासाठी थोडे पाणी वापरले तरी चालते. मात्र जास्त नको. पेस्ट घट्ट करायची नाही. जरा पातळच करायची. एका परातीत पालकाची पेस्ट ओातायची. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. त्यात मैदा घालायचा. तसेच चमचाभर तांदळाचे पीठ घालायचे. पालकाच्या रसात पीठ मळून घ्यायचे. पीठ पोळीसाठी जसे मळतात तसेच मळायचे. 

४. एका कढईत तेल गरम करत ठेवायचे. मळलेल्या पीठाची पोळी लाटायची. जरा जाडसर लाटा. अगदी पातळ लाटू नका. लाटून झाल्यावर सुरीने त्याचे तुकडे करायचे. लांब- लांब  चिप्स जसे असतात तसा आकार द्यायचा. कापून झाल्यावर तेलात सोडायचे आणि तळून घ्यायचे. छान कुरकुरीत होऊ द्यायचे. काढून घ्यायचे आणि मग त्यावर चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चाट मसाला घालायचा आणि मिक्स करायचे. चिप्सला सगळीकडे मसाला लागेल असे नीट मिक्स करायचे.   

Web Title: Spinach chips and hot tea, a monsoon delight! Check out the recipe for spinach chips, monsoon recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.