Join us

spicy and tangy recipes : दही पापडी चाट म्हणजे चवींचा धमाका, दोन मिनिटांत होईल फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2025 08:25 IST

Spicy and Tangy Recipes: Dahi Papadi Chaat is an explosion of flavors, east recipe : दही पापडी चाट करायची सोपी रेसिपी. पाहा काय करायचे.

चाट हा प्रकार सगळ्यांच्याच फार आवडीचा असतो. त्यात अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक फार लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे दही पापडी चाट. करायला अगदी सोपा आहे. (Spicy and Tangy Recipes: Dahi Papadi Chaat is an explosion of flavors, east recipe )सगळीकडेच मिळतो असे नाही. त्यामुळे घरी करणे उत्तम. अगदी दिल्ली स्टाइल पापडी चाट करण्यासाठी मस्त रेसिपी पाहा. चव जबरदस्त आणि बाधतही नाही.   

साहित्य पापडी, दही, बटाटा, कांदा, टोमॅटो, शेव, डाळिंब, काकडी, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, पुदिना, लसूण, पाणी, दही, लिंबू, चिंच, खजूर, मीठ, चाट मसाला, लाल तिखट

कृती१. बटाटे उकडून घ्यायचे. उकडून झाल्यावर सोलून घ्यायचे आणि बटाट्याचे तुकडे करुन घ्यायचे. कांदा सोलून घ्यायचा, कांदा छान बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरायचा. डाळिंब्याचे दाणे सोलून घ्यायचे. काकडी सोलायची आणि काकडीचे बारीक तुकडे करायचे. 

२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा लहान तुकडा घ्या. कोथिंबीर व्यवस्थित निवडून घ्यायची. पुदिनाही निवडायचा. एका मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि पुदिना घ्यायचा थोडे मीठ घालायचे. लिंबाचा रस घालायचा. त्यात थोडे पाणी घाला आणि चटणी वाटून घ्या. 

३. एका पातेल्यात गरम पाणी घ्यायचे आणि त्यात चिंच भिजवायची. तसेच त्यासोबत खजूरही भिजवायचा. खजूर - चिंचेच्या बिया काढून घ्यायच्या. थोडावेळ भिजवल्यावर हाताने कुस्करायचे आणि गाळून घ्यायचे. चटणीत थोडे पाणी घालायचे आणि चटणी उकळून घ्यायची. थोडे मीठ घालायचे.  घट्टही होते तसेच टिकतेही जास्त दिवस. 

४. एका ताटलीत पापडी लावायची. त्यावर बटाट्याचे तुकडे ठेवायचे. तसेच बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच टोमॅटोही घालायचा. वरती गोड चटणी ओतायची. हिरवी चटणीही ओतायची. तसेच चाट मसाला भुरभुरायचा आणि लाल तिखटही घालायचे. डाळिंब्यांचे दाणे घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.  त्यावर शेव घाला आणि मग दही घालायचे. दह्यावर पुन्हा चटण्या आणि शेव घालायची.  

English
हिंदी सारांश
Web Title : Dahi Papadi Chaat: Quick, flavorful Indian street food recipe.

Web Summary : Dahi Papadi Chaat, a popular Indian snack, is easy to make at home. Combine papadi, potatoes, onions, tomatoes, and chutneys. Top with yogurt, sev, and pomegranate seeds for a burst of flavor.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना