खारीक - बदाम खीर हा पारंपरिक आणि पौष्टिक असा पदार्थ हिवाळ्यात खास लोकप्रिय असतो. खारीकेची नैसर्गिक गोडी आणि बदामाचा सुंदर स्वाद यामुळे खीर अतिशय सुगंधी, चविष्ट आणि शरीराला ऊर्जा देणारी होते. खारीक हे सुकवलेले खजूर असल्याने त्यात नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. (Special Kheer Recipe for Women - Make Kheer in Five Minutes - Almond Kheer for Protein and Flavor)त्यातील फायबर पचन सुधारते, तर आयर्नमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्वाचे खनिज घटक स्नायूंच्या कार्याला आधार देतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवतात.
बदाम हा हेल्दी फॅट्स, प्रथिने आणि जीवनसत्त्व इ ने समृद्ध असतो. हे घटक त्वचा, केस, हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. खारीक आणि बदाम एकत्र केल्यावर खीर केवळ स्वादिष्टच नाही तर शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा, पोषण आणि उब देणारी ठरते. हा पदार्थ महिलांसाठी विशेषतः लाभदायक मानला जातो. त्यामुळे महिलांनी नक्की ही खीर खावी.
साहित्य
खारीक, बदाम, पाणी, पत्री खडीसाखर, दूध, तूप
कृती
१. खारीका छान परतून घ्यायच्या. त्यातील बिया काढायच्या. खारकेची बारीक सरसरीत पूड तयार करायची. बदामही परतून घ्यायचे. दोन्ही पदार्थ तुपावरच परतायचे. परतून गार करायचे आणि मग पूड तयार करायची.
२. एका पातेल्यात थोडे पाणी घ्यायचे. पाणी जरा गरम करायचे. मग त्यात खारीक पूड घालायची. तसेच बदाम पूड घालायची. पाणी उकळून घट्ट करायचे. दोन्ही पूड छान शिजल्यावर गॅस बंद करायचा.
३. पातेल्यात दूध गरम करायचे. त्यात उकळलेली पूड घालायची. आवडीनुसार साखर घालायची. जर पत्री खडीसाखर नसेल तर साधी वापरा किंवा साधी साखर घातली तरी चालेल. दूध आणि पूड एकजीव होऊन छान खीर तयार होते. भरपूर उकळायचे. खीर जरा घट्ट झाली की गरमागरम खायची.
