श्रावणात सणवारी कोणत्या भाज्या कराव्यात हा गृहिणींसमोर प्रश्न असतो, शिवाय इतर वेळीही लंच बॉक्ससाठी आणि जेवणातही चटपटीत भाजी करावीशी वाटेल तेव्हा पुढे दिलेली रेसेपी ट्राय करा. स्टफ भेंडी, स्टफ टोमॅटो, स्टफ शिमला मिरची या यादीत स्टफ दोडकीलाही तुम्ही सामावून घ्याल हे नक्की! पुढे दिलेल्या रेसेपीमध्ये दोन पाकळ्या लसूण वापरला आहे, मात्र श्रावणत तो स्किप करता येईल तरीही भाजी तेवढीच चटपटीत होईल. इतर वेळी करण्यासाठी पुढील रेसेपी सेव्ह करून ठेवा.
दोडक्याची स्टफिंग मसाला भाजी रेसेपी :
साहित्य :
१/२ किलो दोडकी
१ चमचा भाजलेले पांढरे तीळ
२ चमचे भाजलेले शेंगदाणे
१ चमचा किसलेले सुके नारळ
२ लसूण पाकळ्या(श्रावणात वगळू शकता) आणि १ हिरवी मिरची
१ चमचा हळद पावडर
२ चमचे लाल मिरची पावडर
२ चमचे धणे-जिरे पावडर
१ चमचा गरम मसाला/ किचन किंग मसालाही वापरता येईल.
चवीनुसार मीठ
१ चमचा तेल
१ चमचा बडीशेप
१ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
कढीपत्ता (कडीपत्ता)
चिरलेली कोथिंबीर
कृती :
>> दोडकी सोलून त्याचे मोठे तुकडे करा.
>> प्रत्येकाच्या मध्यभागी एक भेग पाडा.
>> मसाला भरण्यासाठी पुढील साहित्य मिक्सरमध्ये जाडसर भरडून घ्या.
>> भाजलेले १ चमचा सफेद तीळ आणि २ चमचे शेंगदाणे, १ चमचा किसलेले खोबरे, २ लसूण पाकळ्या आणि १ हिरवी मिरची घाला.
>> त्यातच १ चमचा हळद, २ चमचे लाल मिरची पावडर, २ चमचे धणे-जिरे पावडर, १ चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घाला.
>> तयार मसाला दोडक्यांमध्ये भरून घ्या.
>> पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करा
>> १ चमचा बडीशेप, १ चमचा जिरे, चमूटभर हिंग, कढीपत्ता घाला, भरलेली दोडकी ठेवा आणि पाण्याचा हबका मारा.
>> झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर शिजवा
>> ५-७मिनिटांनी भाजी शिजली का बघा.
>> त्यात उरलेला मसाला घाला आणि आणखी ५ मिनिटं शिजवा.
>> बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.
>> स्टफ केलेली दोडकी आणि गरमागरम फुलके सर्व्ह करा.
पहा मेघना रेसेपीचा व्हिडीओ :