lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > श्रावण सोमवारचा उपवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; पित्त-अपचन होणार नाही-मिळतील उपवासाचे फायदे

श्रावण सोमवारचा उपवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; पित्त-अपचन होणार नाही-मिळतील उपवासाचे फायदे

Shravan Somvar 2023 : काहीजण सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करून  उपवास सोडतात. तर काहीजण पूर्ण दिवस व्रत ठेवून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 08:37 AM2023-08-21T08:37:00+5:302023-08-21T11:45:50+5:30

Shravan Somvar 2023 : काहीजण सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करून  उपवास सोडतात. तर काहीजण पूर्ण दिवस व्रत ठेवून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात.

Shravan Somvar 2023 : Sawan Somwar fasting rules, rituals and significance | श्रावण सोमवारचा उपवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; पित्त-अपचन होणार नाही-मिळतील उपवासाचे फायदे

श्रावण सोमवारचा उपवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; पित्त-अपचन होणार नाही-मिळतील उपवासाचे फायदे

श्रावण (Sawan 2023) सोमवारच्या उपवासांना आजपासून सुरूवात होत आहे. भारतभरातील अनेक भाविक भक्त भगवान शंकराची आराधना करण्यासाठी श्रद्धेने आणि भक्ती भावाने हा उपवास करतात.  धार्मिक परंपरानुसार सोमवारचा उपवास निर्जळी किंवा फलाहार करून दोन्ही प्रकारे केला  जाऊ शकतो. (Sawan Somwar fasting rules, rituals and significance)

काहीजण सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करून  उपवास सोडतात. तर काहीजण पूर्ण दिवस व्रत ठेवून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. (Shravan Somvar 2023) यावर्षी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा सण एकाच दिवशी आला आहे. या निमित्ताने  उपवासाचे काही बेसिक नियम पाहूया. कारण अनेकांना बऱ्याच दिवसांनी उपवास केल्यामुळे  आरोग्याच्या समस्या उद्भवतात अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर होणारा त्रास टाळता येऊ शकतो. (Fasting Rules for sawan  somvar)

1) सोमवारच्या उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ खाणं टाळा. याचा  आरोग्यावर वाईट परिणाम होतो.  पावसाळ्यात  पचनक्रिया कमकुवत होते. अशा स्थितीत उपवासाच्या दिवशी जास्त तेलकट खाल्ल्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता म्हणून उपवासाचे पौष्टीक पदार्थ खा,

2) जर तुम्ही  श्रावण सोमवारचा उपवास करत असाल तर फराळात मीठाचा उपयोग करू नका. तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने मिठाचा आहारात समावेश करत असाल तर सैंधव मीठ खाऊ शकता. उपवासाच्या दिवशी फलाहार करताना प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळा, आपल्याला पोटाला आवश्यक असेल तितकं किंवा त्यापेक्षा कमी आहार घ्या.

3) श्रावणात भगवान शंकाराचा कच्च्या दूधाने अभिषेक केला जातो. म्हणूनच श्रावण सोमवारचा उपवास ठेवणारे लोक दुधाचे सेवन करत नाहीत. तुम्ही आवडीनुसार उपवासाला दूध प्यायचं की नाही ते ठरवू शकता.

4) उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घरात स्वच्छता ठेवावी. कोणाचीही निंदा करू नये, नकारात्मक विचार मनात आणू नये. सकारात्मक विचार करा. 

 

Web Title: Shravan Somvar 2023 : Sawan Somwar fasting rules, rituals and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.