कॉर्नफ्लावर म्हणजे मक्यापासून तयार होणारे हलके आणि मऊ असे पीठ. स्वयंपाकात त्याचा वापर प्रामुख्याने सूप-ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी, तळणीचे पदार्थ कुरकुरीत करण्यासाठी किंवा बेकरी पदार्थांना बांधणी देण्यासाठी होतो. (Should you eat cornflour, which is used to make food crispy? Is it the same as flour or a little better? Know before eating)साधे दिसणारे हे पीठ खरे तर शरीराला काही प्रमाणात ऊर्जा देते आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर ते पचनासही अनुकूल असते. म्हणूनच घरगुती स्वयंपाकात ते वारंवार वापरले जाणे वाईट नाही फक्त प्रमाण योग्य असावे. मात्र, पोषणतत्वांची मर्यादा आणि अति सेवनाचे तोटे यामुळे ते संतुलित प्रमाणातच वापरणे आवश्यक ठरते.
कॉर्नफ्लावरचे मुख्य गुणधर्म म्हणजे हे पूर्णपणे कार्बोहायड्रेट्सने भरलेले असल्यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा देणारे ठरते. थोड्या प्रमाणात त्यातून व्हिटॅमिन-बी समूहातील तत्वे थायमिन, नायसिन आणि फोलेट मिळतात. पचन सुधारण्यासाठी आणि मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी हे घटक उपयोगी मानले जातात. तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी काही खनिजेही त्यात कमी प्रमाणात आढळतात. मक्यासारख्या संपूर्ण धान्याच्या तुलनेत हे पोषण कमी असले तरी, योग्य प्रमाणात घेतल्यास ते शरीरावर जडपणा न आणता ऊर्जा देऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉर्नफ्लावर ग्लूटेन-फ्री असल्यामुळे गहू किंवा जड धान्य पचत नसणाऱ्यांसाठी तो हलका पर्याय ठरतो.
परंतु याचे अति सेवन आरोग्यासाठी फार वाईट. कॉर्नफ्लावरमध्ये फायबर जवळजवळ नसल्यामुळे ते पचनासाठी फार पोषक मानले जात नाही. ते पचते मात्र फायद्याचे ठरत नाही. जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस होणे, जडपणा जाणवणे आणि बद्धकोष्ठता यांसारखे त्रास सहज निर्माण होतात. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने वारंवार कॉर्नफ्लावरयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर हा घटक रक्तातील साखर झपाट्याने वाढवू शकतो, त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी मात्र विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पोषणतत्वांचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे यावर जास्त अवलंबून राहिल्यास आहारातील इतर महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरताही जाणवू शकते.
कॉर्नफ्लावरचा उपयोग स्वयंपाकात आवश्यक करा, पण तो केवळ टेक्स्चर सुधारण्यासाठी वापरणे अधिक योग्य ठरते. त्याच्या हलकेपणामुळे ते पदार्थांना आकर्षक करते, पोषणही देते पण मुख्य पोषणाचा स्त्रोत म्हणून त्याकडे पाहणे चुकीचे आहे. संतुलित आहारासोबत कमी प्रमाणात घेतल्यास कॉर्नफ्लावर उपयुक्त ठरते, मैद्याऐवजी हा पदार्थ वापरणे नक्कीच चांगले आहे. परंतु अति सेवन शरीरावर विरुद्ध परिणाम करू शकते. म्हणूनच त्याचा वापर प्रमाणात, समजून आणि गरजेनुसार करणेच आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
