Lokmat Sakhi >Food > शिल्पा शेट्टी सांगते नाश्त्याला खा हा १ वाटी पदार्थ, फक्त ३ गोष्टी हव्या - तब्येत ठणठणीत

शिल्पा शेट्टी सांगते नाश्त्याला खा हा १ वाटी पदार्थ, फक्त ३ गोष्टी हव्या - तब्येत ठणठणीत

Shilpa Shetty's diet food, tips for healthy breakfast, easy and tasty also, food that keeps you strong : शिल्पा शेट्टीची खास पौष्टिक रेसिपी. नाश्त्याला खाते अगदी साधा पण आरोग्यदायी पदार्थ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2025 14:53 IST2025-07-27T14:52:04+5:302025-07-27T14:53:37+5:30

Shilpa Shetty's diet food, tips for healthy breakfast, easy and tasty also, food that keeps you strong : शिल्पा शेट्टीची खास पौष्टिक रेसिपी. नाश्त्याला खाते अगदी साधा पण आरोग्यदायी पदार्थ.

Shilpa Shetty's diet food, tips for healthy breakfast, easy and tasty also, food that keeps you strong | शिल्पा शेट्टी सांगते नाश्त्याला खा हा १ वाटी पदार्थ, फक्त ३ गोष्टी हव्या - तब्येत ठणठणीत

शिल्पा शेट्टी सांगते नाश्त्याला खा हा १ वाटी पदार्थ, फक्त ३ गोष्टी हव्या - तब्येत ठणठणीत

ओट्स हे फायबरने समृद्ध असतात. विशेषतः त्यामध्ये बेटा-ग्लुकान नावाचे पाण्यात विरघळणारे फायबर असते. जे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. (Shilpa Shetty's diet food, tips for healthy breakfast, easy and tasty also, food that keeps you strong )त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओट्स उपयुक्त ठरतात. शिवाय, ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीरात हळूहळू मिसळतात आणि त्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते. भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रित राहते.

चिया सिड्स हे एक पौष्टिक बीज आहेत. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, प्रथिने, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतात. मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतात. चिया सिड्स पाण्यात भिजवल्यानंतर फुलतात आणि आकारापेक्षा जास्त मोठे होतात. या बिया पचनास मदत करतात व आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

बदामाचे दूध हे लॅक्टोज-फ्री पर्याय असून त्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ई' मोठ्या प्रमाणात असते. त्यात मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स नावाचे सत्व असते असते. हे दूध हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि त्वचेला पोषण देते. त्यात कोलेस्टरॉल नसल्यामुळे ते हृदयासाठी सुरक्षित मानले जाते. बदामाचे दूध हे हलके असते आणि त्याची चव चांगली असते. 

या तीन घटकांचे एकत्रित मिश्रण केल्यास नाश्त्याच्या वेळी एक संपूर्ण, संतुलित आणि आरोग्यदायी पर्याय मिळतो. हे मिश्रण शरीराला आवश्यक ऊर्जा देते. पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि रक्तदाब, कोलेस्टरॉल तसेच रक्तातील साखर यांचे प्रमाण नीट ठेवते. नियमितपणे हे मिश्रण खाल्यास त्वचा आणि केसांच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते. शिवाय, हे मिश्रण तयार करणे सोपे आहे आणि कोणत्याही अनहेल्दी गोड पदार्थांशिवाय केलेले आहे.

साहित्य 
ओट्स, चिया सिड्स, बदामाचे दूध, मध, सुकामेवा  

कृती
१. रात्री एका वाडग्यात किंवा खोलगट पातेल्यात वाटीभर ओट्स आणि चार चमचे चिया सिड्स घ्यायचे. त्यात बदामाचे दूध घालायचे. रात्रभर झाकून ठेवायचे. छान भिजवून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात थोडे दूध घालायचे. घट्ट झालेले मिश्रण जरा मऊ करायचे. 

२. त्यात वरतून मध घालायचे. आवडीनुसार सुकामेवा घालायचा. नाही वापरला तरी हरकत नाही. सगळं छान मिक्स करायचे आणि नाश्त्याला खायचे. यामध्ये भरपूर फायबर आहे. फार पौष्टिक नाश्ता आहे.  

Web Title: Shilpa Shetty's diet food, tips for healthy breakfast, easy and tasty also, food that keeps you strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.