शिल्पा शेट्टी नेहमीच आरोग्यदायी जीवनशैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. फक्तकोमता व्यायाम करावा एवढेच नाही तर काय खावे हे ही ती सांगत असते. ती कायम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा डाएट रेसिपी शेअर करते. तिच्या रेसिपींमध्ये कमी तेल, भरपूर भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि नैसर्गिक गोडवा असतो. (See the recipe for moongdal payasam given by Shilpa Shetty to Farah Khan, you can also make this very easy and delicious dish at home)त्यामुळे चव न गमावता आरोग्य टिकवता येते आणि वजन नियंत्रणात राहते. अशीच एक शिल्पाची आवडती डीश तिने फराह खानशी गप्पा मारताना सांगितली. शिल्पाने मूगडाळ पायसम ही रेसिपी शेअर केली. साखर न घालता कमी गुळात छान गोड पदार्थ कसा करायचा त्यासाठी ही रेसिपी पाहा.
साहित्य
मूगडाळ, साबुदाणा, तूप, काजू, बदाम, बेदाणे, दूध, वेलची पूड, गूळ
कृती
१. एका कुकरमध्ये मूगडाळ आणि साबुदाणा एकत्र शिजवायचा. त्यासाठी एक वाटी मूगडाळ घेतली तर एक वाटीला थोडा कमी साबुदाणा घ्यायचा. त्यात पाणी जास्त ठेवायचे. नेहमी ठेवता त्यापेक्षा जास्त पाणी ठेवा. आणि मस्त शिट्या काढून घ्या. डाळ नेहमीपेक्षा जास्त शिजवा.
२. एका कढईत थोडे तूप घ्या. तूप जरा गरम झाले की त्यात काजू घाला आणि मस्त परतून घ्या. काजू परतल्यावर त्यात बेदाणे घाला आणि बदामही घाला. सगळा सुकामेवा छान परतून घ्या. त्यात थोडे दूध घाला आणि उकळी काढून घ्या. दूध उकळल्यावर त्यात कुकरमध्ये शिजवलेले साबुदाणा आणि मूगडाळीचे मिश्रण घाला. छान ढवळून घ्या. पदार्थ एकजीव करुन घ्या.
३. त्यात गूळ घाला. गूळही अर्धी वाटी घाला. बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ घ्यायचा. गूळाचे प्रमाण तुमच्या चवी नुसार ठरवले तरी चालेल. गूळ घातल्यावर त्यात चमचाभर वेलची पूड घालायची. मस्त उकळू द्यायचे. हळूहळू मिश्रण आटायला लागेल. मिश्रण आटल्यावर त्यावर झाकण ठेवा आणि वाफ काढून घ्या. मग गॅस बंद करा आणि गरमागरम पायसम आनंदाने खा.