Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम भातावर तूप आणि त्यावर सुक्या खोबऱ्याच्या वाटणाचं वरण म्हणजे स्वर्गसुख !! पाहा परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 13:07 IST

See the perfect recipe for varan - Healthy and tasty phodnicha varan recipe : वाटणाचे चविष्ट वरण नक्की करा. एकदम मस्त रेसिपी.

कितीही फॅन्सी पदार्थ खाल्ले तरी शेवटी वरणभाताची सर कशालाच नाही. विविध प्रकारचे वरण आणि आमटी आपण करतो. चवीला साधेच तरीही आनंद देणारं वरण आपल्या आहारात नेहमीच असतं. मात्र तुम्ही सुक्या खोबर्‍याच्या वाटणाचं वरण कधी खाल्ल का? सोपीच मात्र फार चमचमीत रेसिपी आहे. पाहा कसे करायचे फोडणीचे वाटणाचे वरण. 

साहित्य सुकं खोबरं, मूगडाळ, तूरडाळ, टोमॅटो, पाणी, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे, कडीपत्ता 

कृती१. मूगडाळ आणि तूरडाळ सम प्रमाणात घ्यायची. एका पातेल्यात घ्यायची आणि धुवायची. स्वच्छ धुतल्यावर एका कुकरमध्ये डाळ घ्यायची. टोमॅटो चिरुन घ्यायचा आणि त्यात घालायचा. चमचाभर हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. थोडे पाणी घालायचे. कुकर लावायचा आणि डाळ मस्त शिजवून घ्यायची.

२. एका मिक्सरच्या भांड्यात ससुकं खोबरं घ्यायचं. त्यात कोथिंबीर घालायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच लसणाच्या काही सोललेल्या पाकळ्या घालायच्या. त्यात थोडं जिरं घाला. छान वाटून घ्यायचं. जाडसर वाटण तयार करायचं. 

३. एका कढईत तेल घ्यायचं. तेल जरा कोमट झालं की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता मस्त फुलला की त्यात तयार केलेले वाटण घालायचे. वाटण मस्त परतून घ्यायचं. दोन ते पाच मिनिटे परतायचे. त्यात शिजलेली डाळ घालायची. ढवळून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर  घालायची. आमटी छान उकळायची. आवडीनुसार घट्टपणा ठरवा. गरज असेल तर पाणी घाला. मस्त गरमागरम भातासोबत हे वरण आणि पापड म्हणजे सुख. 

English
हिंदी सारांश
Web Title : Coconut Varan Recipe: A Simple, Delicious Comfort Food Delight!

Web Summary : Enjoy the simple pleasure of Varan Bhat! This recipe offers a flavorful twist using coconut. Cooked lentils are tempered with a spiced coconut paste, creating a comforting and delicious dish. Perfect with rice and papad!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजना