पंचामृत हे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण असून ते आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि पचायला हलके असते. गरोदर स्त्रियांना रोज थोडे पंचामृत खायला सांगितले जाते. (see the perfect recipe for Panchamrut, make it tasty and healthy too, everyone should try )शरीरासाठी फार उपयुक्त असते. यात असलेले दूध शरीराला कॅल्शियम देते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. दही पचनशक्ती सुधारते आणि आतड्यांसाठी फार चांगले असते. आतड्यांतील उपयुक्त जिवाणूंची वाढ करते. तूप शरीराला ऊर्जा पुरवते. तूप खाणे आरोग्यासाठी फार चांगले असते.
तुपामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्यही छान राहते. मध नैसर्गिक गोडवा देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवते. साखर जरी फार पौष्टिक पदार्थ नसला तरी शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम साखर करते. पंचामृतामुळे शरीरातील उष्णता कमी होते पोट शांत राहते. यातील पदार्थांमुळे जीवनसत्वे आणि खनिजे एकत्रित मिळतात. त्यामुळे थकवा कमी होतो आणि मानसिक आरोग्यही छान राहते.
हे पदार्थ आपण वेगवेगळे खातोच. मात्र त्यांचे मिश्रण जास्त पौष्टिक असते. त्यामुळे पंचामृत खावे. मात्र कोणता पदार्थ किती प्रमाणात असावा हे जाणून घेणे गरजेचे असते. अर्थात सगळ्यांचे प्रमाण घेण्याची पद्धत वेगळी असते. तरी एकदा हे प्रमाण पाहा. उष्णतेचा त्रास न होता पंचामृत खाऊ शकाल.
साहित्य (प्रमाणासकट)
३ ते ५ चमचे दूध
अर्धा चमचा साखर
अर्धा चमचा मध
१ चमचा तूप
अर्धा चमचा दही
कृती.
१. ताजे दूध घ्या. गायीचं किंवा म्हशीचं ताजं दूध ३ ते ५ चमचे घ्यायचे. त्यात अगदी थोडी अर्धा चमचा साखरच घालायची. साखरेचे प्रमाण जर जास्त घेतले तर पंचामृत चवीला तर छान लागेल मात्र त्यात पोषण उरणार नाही. शरीराला फायदा होण्याऐवजी तोटाच होईल.
२. मध उष्ण असते. त्यामुळे मधही अर्धा चमचाच घ्यायचे. त्यात चमचाभर घरचे तूप घाला. घरचे साजूक तुपच वापरावे. त्यामधून मिळणारे पोषण विकतच्या तुपात मिळत नाहीत. तसेच चवही वेगळी लागते. अर्धा चमचा दही घ्यायचे. दही घरचे गोड असेल तर उत्तम. या प्रमाणात पदार्थ घ्यायचे. म्हणजे ते शरीरासाठी फार पौष्टिक ठरते.