'साजूक तूप' हा भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा असा खास पदार्थ. आजही कित्येक घरोघरी साजूक तूप विकत न आणता, पारंपरिक पद्धतीने साजूक तूप तयार केले जाते. साजूक तूप (secret to make ghee from milk cream) घरच्याघरीच पारंपरिक पद्धतीने तयार करण्याची प्रक्रिया ही, खूप मोठी व वेळखाऊ असली तरी घरगुती तुपासारखे दुसरे काहीच नाही. साजूक तूप तयार (use leftover khoya to make extra ghee) करण्यासाठी, दुधावरची जाड साय आधी १० ते १५ दिवस साठवून ठेवली जाते. त्यानंतर, याच सायीचे अस्सल दाणेदार - रवाळ साजूक तूप तयार केले जाते. साजूक तूप तयार करताना अनेक गृहिणींची एक तक्रार असते की, घरी तयार केलेल्या तुपाची बेरी खूपच शिल्लक राहते आणि त्यातून पुरेसे तूप निघत नाही(how to make desi ghee from malai at home).
काहीवेळा, साय कमी असली तरीही आपल्याला अधिक तूप काढता यावे असे वाटते. परंतु आपण घरच्याघरीच तूप तयार करताना, उरलेली बेरी किंवा कमी सायीत जास्तीत जास्त साजूक तूप कसे काढता येईल याची, एक भन्नाट ट्रिक पहाणार आहोत. आपण एका साध्यासोप्या भन्नाट ट्रिकच्या मदतीने, कमी सायीत किंवा साजूक तूप कढवून उरलेल्या बेरीतून देखील जास्तीचे साजूक तूप झटपट काढू शकता. या सोप्या ट्रिकमुळे कोणताही पदार्थ वाया न जाता त्यापासून जास्तीचे तूप अगदी सहजपणे काढता येऊ शकते. उरलेल्या बेरीचे किंवा कमी सायीत देखील जास्तीत जास्त साजूक तूप काढण्याची सोपी व फायदेशीर पद्धत पाहूयात...
उरलेल्या बेरीचे किंवा कमी सायीत जास्त साजूक तूप काढण्याची युक्ती...
१. प्रत्यक्षात, साजूक तूप काढण्याची ही नवीन पद्धत, नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. साधारणपणे, आपण साठवलेली साय गरम करून तूप काढतो आणि उरलेल्या बेरीचा वापर करुन अनेक पदार्थ तयार करतो. परंतु , इंस्टाग्राम वरील preeti_upadhayay या अकाउंटवरून उरलेल्या बेरीमधूनही किंवा कमी सायीत देखील साजूक तूप कसे काढायचे, याची खास ट्रिक सांगितली आहे. यामुळे फक्त तुपाचे प्रमाणच वाढत नाही, तर ही एक प्रकारची 'झीरो-वेस्ट' (Zero-Waste) पद्धत आहे.
२. सर्वप्रथम, साठवून ठेवलेली साय एका जाड कढईत घालून एकत्रित करा. कढई थोडी जाडसरच जेणेकरून मलाई जळणार नाही. आता गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा. साय हळूहळू वितळू लागेल आणि तिला उकळी येऊ लागेल. जसजशी साय शिजत जाईल, तसतसे तूप वेगळे होईल आणि बेरी खाली कढईच्या तळाशी बसेल.
३. जेव्हा तूप पूर्णपणे वेगळे होईल आणि बेरीला हलकासा तपकिरी रंग येऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करा. आता हे तूप गाळणीच्या मदतीने गाळून एका स्वच्छ डब्यात किंवा भांड्यात काढा. अशा प्रकारे, तुमच्या पहिल्या बॅचमधील शुद्ध तूप तयार होईल.
मळून ठेवलेली कणिक किती दिवसात खराब होते? पाहा फ्रिजमध्ये कणिक किती दिवस ठेवणं योग्य?
४. आता उरलेल्या बेरीमध्ये थोडे पाणी आणि ५ ते ६ बर्फाचे तुकडे टाका. पाणी जास्त नसावे, फक्त बेरी त्यात व्यवस्थित भिजेल इतकेच पाणी घाला. या मिश्रणाच्या बरोबर मध्यभागी एक ग्लास किंवा एक छोटी वाटी ठेवा. बर्फाचे तुकडे आणि ग्लासच्या मदतीने बेरीमध्ये असलेले उरलेले लोणी गोठायला सुरुवात होईल आणि हळूहळू वर तरंगू लागेल.
५. जेव्हा तुम्हाला पाण्यावर लोण्याचा थर तरंगताना दिसेल, तेव्हा तो चमचा किंवा पळीच्या मदतीने काळजीपूर्वक काढा. आता हे काढलेले लोणी दुसऱ्या एका भांड्यात घालूंन मंद आचेवर पुन्हा गरम करा. तुम्ही पाहाल की या लोण्यापासूनही बऱ्यापैकी तूप निघेल. हे तूप देखील गाळून पहिल्या तुपात मिसळा. अशा प्रकारे, आपण कमी सायीत किंवा साजूक तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीपासून देखील पुन्हा साजूक तूप काढू शकता. आहे की नाही हा भन्नाट देसी जुगाड, एकदा नक्की करुन तर पाहा...