lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : झटपट पण चविष्ट नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असे गोडाचे पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 12:29 PM2023-11-30T12:29:53+5:302023-11-30T14:41:23+5:30

Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : झटपट पण चविष्ट नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असे गोडाचे पदार्थ

Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : Make 3 simple sweet dishes to offer to Bappa on Sankashti Chaturthi; Cooking will be quick while breaking the fast | संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी करा ३ सोपे गोड पदार्थ, उपवास सोडताना वाटेल प्रसन्न

गणपती बाप्पा हा बहुतांश भक्तांसाठी आराध्यदैवत.बाप्पावर मनापासून भक्ती असणारे हे भक्त महिन्यातून एकदा येणारा चतुर्थीचा उपवास आवर्जून करतात. गणपती बाप्पाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात यासाठी संकष्टी चतुर्थीला अतिशय भक्तीभावाने उपवास केला जातो. बाप्पाला मोदक आवडतात म्हणून चतुर्थीचा नैवेद्य म्हणून बहुतांशवेळा उकडीचे किंवा तळणीचे मोदक केले जातात. पण आठवड्याचा दिवस असेल आणि आपल्याला ऑफीस आणि इतर कामं असतील तर मोदक करायला वेळ होतोच असे नाही. अशावेळी चंद्रोदयाला बाप्पांची आरती करुन त्यांना झटपट पण चविष्ट नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असे सोपे गोडाचे पदार्थ कोणते करता येतील याचे काही पर्याय आज आपण पाहणार आहोत. हातात कमी वेळ असेल आणि तरीही पोळी, भाजी, भात, आमटी, कोशिंबीर, चटणी, गोड असे सगळे करायचे असेल तर हे पदार्थ जास्त वेळ न जाता होत असल्याने ते आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून नक्कीच दाखवू शकतो (Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe). 

१. गाजराचा हलवा

सध्या गाजराचा सिझन असून हलवा करण्यासाठी खूप सामानही लागत नाही. तूपावर गाजराचा किस परतून त्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा आणि साखर घालून सगळे चांगले एकजूव करायचे. यामध्ये वेलची पूड, सुकामेवा आपल्या आवडीप्रमाणे घालून थोडेसे दूध घालून हा हलवा छान शिजवायचा. गाजराचा गरमागरम हलवा पुरी, पोळी किंवा अगदी नुसताही खायला छान लागतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. मूग हलवा 

मूगाची डाळ आपल्या घरात असतेच. ही डाळ भाजून मिक्सरमधून काढायची आणि भरपूर तूप घालून चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालून हे सगळे तूपावर चांगले परतून घ्यायचे. मूग आरोग्यासाठी चांगले असल्याने आपण गोड खातानाही हेल्दी पर्यायाचा विचार करु शकतो. यामध्ये सुकामेवा, केशर घातल्यास या हलव्याचा स्वाद वाढण्यास मदत होते. 

३. तांदळाची खीर 

करायला अतिशय सोपी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही सोपी रेसिपी एरवी फारशी केली जात नाही. पण चतुर्थीच्या निमित्ताने आपण ही खीर नक्की करु शकतो. यासाठी तांदूळ भाजून घेऊन मिक्सरमधून ओबडधोबड बारीक करुन घ्यायचे. तूपावर तांदूळ आणि ओलं खोबरं चांगले परतून घेऊन त्यामध्ये साखर आणि दूध घालून हे सगळे चांगले शिजवून घ्यायचे. सुकामेवा, खवा, केशर, वेलची पूड यांसारख्या गोष्टी घालून आपण या खिरीचा स्वाद वाढवू शकतो. 

Web Title: Sankashti Chaturthi Special Ganpati Naivedya options Recipe : Make 3 simple sweet dishes to offer to Bappa on Sankashti Chaturthi; Cooking will be quick while breaking the fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.