lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड- सारण करायची गरजच नाही, १० मिनीटांत करा खोबरं-गुलकंदाचे चविष्ट मोदक

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड- सारण करायची गरजच नाही, १० मिनीटांत करा खोबरं-गुलकंदाचे चविष्ट मोदक

Sankashti Chaturthi special Coconut Gulkand modak recipe : फारसे कष्ट न घेता केले जाणारे हे मोदक तोंडात टाकले की विरघळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 01:29 PM2024-02-28T13:29:27+5:302024-02-28T16:12:03+5:30

Sankashti Chaturthi special Coconut Gulkand modak recipe : फारसे कष्ट न घेता केले जाणारे हे मोदक तोंडात टाकले की विरघळतात.

Sankashti Chaturthi Special Coconut Gulkand modak recipe : make delicious coconut-gulkanda modak in 10 minutes | संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड- सारण करायची गरजच नाही, १० मिनीटांत करा खोबरं-गुलकंदाचे चविष्ट मोदक

संकष्टी चतुर्थी स्पेशल : उकड- सारण करायची गरजच नाही, १० मिनीटांत करा खोबरं-गुलकंदाचे चविष्ट मोदक

चतुर्थी आली की दरवेळी कोणते मोदक करायचे असा प्रश्न गणेश भक्तांसमोर असतो. त्यात वर्कींग डे असेल तर ऑफीस झाल्यावर घरी जाऊन नैवेद्याचा घाट घालावा लागतो. अशावेळी झटपट होणारी एखादी मोदकाची रेसिपी असेल तर स्वंयपाकाचे काम सोपे होते. उकडीचे किंवा तळणीचे मोदक करायला बऱ्यापैकी वेळ लागत असल्याने आज आपण झटपट होणारे असे खोबरं आणि गुलकंदाचे मोदक पाहणार आहोत. अगदी कमीत कमी पदार्थांपासून फारसे कष्ट न घेता केले जाणारे हे मोदक तोंडात टाकले की विरघळतात. सुकं खोबरं घरात नसलं तर हल्ली बाजारातही बारीक किसलेलं खोबरं अगदी सहज मिळतं. गुलकंद साधारणपणे आपल्याकडे असतोच.पण नेहमी तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर हे चविष्ट आणि थोडे वेगळे असे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करु शकता. अगदी १० मिनीटांत होणारे हे मोदक कसे करायचे पाहूया (Sankashti Chaturthi special Coconut Gulkand modak recipe)...

१. बाजारात डेसिकेटेड खोबरे मिळते ते साधारण २ वाट्या घ्यायचे. हे पूर्णपणे पांढरे आणि एकदम बारीक असल्याने त्याचे मोदक छान होतात. 

२. कढईत तूप घालून हा किस थोडासा परतून घ्यायचा. 

(Image : Google)
(Image : Google)

३. गॅस बंद करून किस काढून घ्यायचा आणि त्याच कढईत पुन्हा चमचाभर तूप घालून  खसखस, काजू, बदाम, पिस्ता यांची बारीक पावडर आणि वेलची पूड घालायची. 

४. खोबऱ्यामध्ये हे सुकामेव्याचे मिश्रण घालायचे आणि वरून साधारण पाऊण ते एक वाटी गुलकंद घालायचा. 

५. हाताने हे सगळे चांगले एकजीव करून घ्यायचे आणि साच्यातून मोदक तयार करायचे. 

६. गुलकंद भरपूर गोड असल्याने या मोडकांना साखर किंवा गूळ लागत नाही. पण तुम्हाला कमी गोड वाटल्यास सगळे एकत्र करताना तुम्ही अंदाजे पिठीसाखर घालू शकता.


 

Web Title: Sankashti Chaturthi Special Coconut Gulkand modak recipe : make delicious coconut-gulkanda modak in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.