Join us
Daily Top 2Weekly Top 5

इडली पात्रात साबुदाणा वडा करण्याची 'स्मार्ट' ट्रिक! तेल कमी - चव अप्रतिम - करा 'झिरो ऑईल' साबुदाणा वडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2026 18:22 IST

sabudana vada in idli maker : sabudana vada without frying : sabudana vada with less oil : idli maker sabudana vada : फार कमी वेळात, जास्तीची मेहनतीत न घेता आणि गॅसची बचत करणारा 'इडली पात्रातील साबुदाणा वडा' करण्याची खास रेसिपी...

उपवास असो, सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळची भूक अशावेळी साबुदाण्याचे वडे म्हणजे सगळ्यांचाच आवडता विषय... विशेष करुन उपवासाला घरोघरी केले जाणारे साबुदाणे वडे एरवी देखील नाश्त्याला मोठ्या आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच्या तळलेल्या वड्यांमध्ये जास्त तेल शोषले जाते, त्यामुळे ते खाणं  आरोग्यासाठी फारसे योग्य वाटत नाहीत. इतकेच नाही तर, साबुदाणा वडा तळताना तो तेलात फुटण्याची भीती किंवा अति तेलामुळे येणारा तेलकटपणा यामुळे अनेकजण हा पदार्थ टाळतात. अशावेळी जर अगदी कमी तेलात, कुरकुरीत आणि झटपट साबुदाणा वडा तयार करता आला तर? चवीशी कोणतीही तडजोड न करता, आपण अगदी कमी तेलात आणि झटपट साबुदाणा वडा तयार करु शकतो, ते ही चक्क घरातील इडली पात्रात... इडली पात्राचा वापर करून हे वडे अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतात. तळणीचा त्रास नाही, जास्त तेल नाही आणि चवीला मात्र पारंपरिक वड्यांसारखेच स्वादिष्ट!(idli maker sabudana vada).

इडली पात्रात वाफेवर आणि अगदी नावापुरत्या तेलावर तयार होणारे हे वडे बाहेरून तितकेच कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. डाएट करणाऱ्यांसाठी आणि तेलकट पदार्थ न खाणाऱ्यांसाठी हा उत्तम (sabudana vada in idli maker) पर्याय आहे. फार कमी वेळात, जास्तीची मेहनतीत न घेता आणि गॅसची बचत (sabudana vada without frying) करणारा हा 'इडली पात्रातील साबुदाणा वडा' कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :-

१. साबुदाणा - १ कप २. उकडलेले बटाटे - ३ ते ४ (मध्यम आकाराचे)३. शेंगदाण्याच्या कूट - १/२ कप ४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)५. आलं - १/२ टेबलस्पून (किसलेलं)६. जिरे - १/२ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार८. साखर - १/२ टेबलस्पून ९. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ११. तेल - २ ते ३ टेबलस्पून

साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत... 

साबुदाणा बाऊलमध्ये घेऊन किमान २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा. मग इतकंच पाणी घाला की साबुदाणा फक्त झाकला जाईल. ४ ते ६ तास किंवा रात्रभर भिजवा. भिजल्यानंतर साबुदाणा हाताने दाबून पाहा, सॉफ्ट झाला की तयार.

कृती :- 

मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्या. त्यात उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घाला. कुटलेले शेंगदाणे, जिरे, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर घाला.शेवटी लिंबाचा रस टाका. हे मिश्रण २ ते ३ मिनिटे हाताने व्यवस्थित मळा. मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर १ चमचा शेंगदाण्याची पूड अजून घाला किंवा १ चमचा राजगिरा पीठ/उपवासाचे पीठ घाला. हाताला थोडं तेल लावा, लिंबाएवढे गोळे तयार करा. हलके दाबून टिक्की/वड्यासारखा आकार द्या.

तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार, कुरकुरीत आप्पे! पोट भरेल, वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ... 

घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...

सगळे वडे तयार करून ठेवा. इडली पात्र/इडली स्टँड घ्या प्रत्येक साच्यात अर्धा चमचा तेल घाला किंवा ब्रशने तेल लावा. प्रत्येक साच्यात १ वडा ठेवावरूनही थोडंसं तेल ब्रशने लावा. इडलीच्या भांड्यात १ ग्लास पाणी घाला इडली स्टँड ठेवा झाकण लावा, पण शिटी काढून ठेवा. १० ते १२ मिनिटे वाफ द्या. वाफ झाल्यावर स्टँड बाहेर काढा वडे उलटे करा वरून पुन्हा थोडं तेल लावा पुन्हा ६ ते ८ मिनिटे वाफवून घ्या. यामुळे वडे बाहेरून छान क्रिस्पी होतात. जर  आपल्याला वडे अजून कुरकुरीत हवे असतील तर, वाफेवर झालेले वडे काढून तव्यावर २ ते ३ मिनिटे दोन्ही बाजूने शॅलो रोस्ट करा.

परफेक्ट वडे होण्यासाठी खास टिप्स... 

१. साबुदाणा मोकळा व कोरडा असला पाहिजे.२. वड्यांच्या मिश्रणात बटाटा जास्त झाला तर वडे नरम होतात त्यामुळे उकडलेल्या बटाट्याचे प्रमाण सांभाळा. ३. मिश्रण मळल्यावर ५ मिनिटे सेट होऊ द्या.४. साच्यात तेल कमी घातले तरी चालते, पण वड्यांवर पुरेसे तेल लावून घ्या. ५. वडे उलटे करून, पुन्हा वाफवणे मिस करू नका.६. साबुदाणा वडे अगदी क्रिस्पी हवे असतील तर शेवटी तवा किंवा एअर फ्रायरमध्ये २ ते ३ मिनिटे शेकून घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Smart Sabudana Vada Trick: Make Zero Oil Vada in Idli Maker!

Web Summary : Make healthy, crispy Sabudana Vada in an idli maker using minimal oil. This recipe avoids deep-frying, offering a tasty, guilt-free snack perfect for fasts or any time.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स