Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार कुरकुरीत आप्पे! पोट भरेल- वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ...

तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार कुरकुरीत आप्पे! पोट भरेल- वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ...

Daliya appe : How To Make Daliya Appe At Home : Daliya appe recipe : चवीला भन्नाट आणि आरोग्याला पोषक असणारे 'मऊसूत लुसलुशीत दलिया आप्पे' करण्याची इन्स्टंट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2026 18:16 IST2026-01-26T13:06:23+5:302026-01-28T18:16:03+5:30

Daliya appe : How To Make Daliya Appe At Home : Daliya appe recipe : चवीला भन्नाट आणि आरोग्याला पोषक असणारे 'मऊसूत लुसलुशीत दलिया आप्पे' करण्याची इन्स्टंट रेसिपी...

Daliya appe How To Make Daliya Appe At Home Daliya appe recipe | तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार कुरकुरीत आप्पे! पोट भरेल- वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ...

तेलाचा थेंबही न वापरता करा दलियाचे जाळीदार कुरकुरीत आप्पे! पोट भरेल- वजनही वाढणार नाही असा पौष्टिक पदार्थ...

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी रोज काय नवीन पदार्थ करायचे? असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला सतावतोच. घराघरांत नाश्त्याला पोहे, उपमा, इडली, मेदू वडा असे काही कॉमन पदार्थ हमखास केलेच जातात. परंतु बरेचदा आपल्याला नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो, अशावेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट तसेच पौष्टिक - पोटभरीच खाण्याची खूप इच्छा होते. सहसा आपल्याकडे दलियाची लापशी किंवा खिचडी खाल्ली जाते, परंतु या नेहमीच्या पदार्थांना थोडा हटके ट्विस्ट देत आपण चक्क दलियाचे आप्पे झटपट तयार करु शकतो. भरपूर भाज्या घालून केलेले पौष्टीक आप्पे हा इन्स्टंट पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे(Daliya appe).

रवा किंवा तांदळाच्या आप्प्यांना एक उत्तम आरोग्यदायी पर्याय म्हणून दलियाचे आप्पे आता घरोघरी मोठ्या आवडीने खाल्ले जातात. चवीला चटपटीत असणारे हे आप्पे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पटकन फस्त करतील. गव्हाच्या भरड्यापासून तयार केलेले आप्पे खायला कुरकुरीत आणि पचायला हलके असतात. कमी तेलात (Daliya appe recipe) तयार होणारा हा प्रोटीनयुक्त नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. फायबर, प्रोटीन आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेला दलिया वापरून तयार केलेले आप्पे पचायला हलके, पोटभरू आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करणारे असतात. चवीला भन्नाट आणि (How To Make Daliya Appe At Home) आरोग्याला पोषक असणारे 'मऊसूत लुसलूशीत दलिया आप्पे' करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. दलिया - १ कप 
२. पातळ पोहे - १/२ कप 
३. दही - १/२ कप 
४. पाणी - गरजेनुसार 
५. गाजर - १/२ कप (बारील किसलेलं)
६. मटार दाणे - १/२ कप (उकडवून घेतलेले) 
७. शिमला मिरची - १/२ कप (बारीक तुकडे केलेले)
८. टोमॅटो - १/२ (बारीक तुकडे केलेले)
९. पालक - १/२ कप (बारीक चिरलेला)
१०. मीठ - चवीनुसार
११. तेल - ३ ते ५ टेबलस्पून 
१२. जिरे - १/२ टेबलस्पून 
१३. मोहरी - १/२ टेबलस्पून 
१४. पांढरे तीळ - १/२ टेबलस्पून 
१५. हिंग - चिमूटभर
१६. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१७. कडीपत्ता - ३ ते ४ पाने 

शिळ्या भाजीचे गरमागरम टेस्टी पराठे, आजीबाईच्या स्वयंपाकघरातलं सिक्रेट-५ मिनिटांत हॉटेलसारखे खरपूस पराठे ताटात..


कृती :-

१. एका मोठ्या बाऊलमध्ये दलिया, पातळ पोहे, दही आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून २ तास भिजत ठेवावं. मिश्रण २ ते ३ तासानंतर व्यवस्थित भिजल्यावर ते मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून त्याचे बॅटर तयार करून घ्यावे. 

घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...

चमचाभर तेलात आप्पे पात्रात करा खमंग बटाटेवडे! अजिबात तेलकट न होता लागतील खमंग...

२. या तयार बॅटरमध्ये बारीक किसलेलं गाजर, उकडवून घेतलेले मटार दाणे, शिमला मिरची, पालक किंवा आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या बारीक चिरुन घालू शकता. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालावे. 
३. एका छोट्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, पांढरे तीळ, हिंग, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करावी. ही तयार फोडणी आप्पे बॅटरमध्ये घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावे. 
४. आप्पे पात्रात थोडं तेल घालून तयार बॅटर चमच्यांने आप्पे पात्रात घालावे, वर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे. दोन्ही बाजूने आप्पे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावेत. 

दलियाचे गरमागरम पौष्टिक असे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. चटणी किंवा सॉससोबत आप्पे खाण्यास अधिक चविष्ट लागतात.

Web Title : स्वस्थ दलिया अप्पे रेसिपी: तेल-मुक्त, कुरकुरी और पौष्टिक नाश्ता

Web Summary : दलिया अप्पे, पारंपरिक स्नैक्स का एक स्वस्थ विकल्प, त्वरित और पौष्टिक है। टूटे हुए गेहूं और सब्जियों से बने, ये कुरकुरे, प्रोटीन युक्त व्यंजन पचाने में आसान होते हैं और वजन नियंत्रण को बढ़ावा देते हैं, जो एक अपराध-मुक्त नाश्ते के लिए बिल्कुल सही हैं।

Web Title : Healthy Dalia Appe Recipe: Oil-Free, Crispy & Nutritious Breakfast

Web Summary : Dalia appe, a healthy alternative to traditional snacks, is quick and nutritious. Made with broken wheat and vegetables, these crispy, protein-rich delights are easy to digest and promote weight control, perfect for a guilt-free breakfast.