Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजलेले शेंगदाणे म्हणजे चव खरपूस-खातंच राहावे! आरोग्यासाठीही फायर फायद्याचे-स्वस्त प्रोटीन स्नॅक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 16:40 IST

Roasted peanuts are delicious - good for your health - protein snacks : चविष्ट शेंगदाणे नक्की खा कारण आरोग्यासाठी चांगले.

अनेक असे पदार्थ आहेत जे आपण घरी खातोच. त्याची चवही छान असते आणि त्याचा वजनावर फार परिणाम होत नाही. असाच एक पदार्थ म्हणजे शेंगदाणे. पोहे करताना एखादी भाजी करताना त्यात चवीसाठी आपण शेंगदाणे घालतो. भाजलेले शेंगदाणे आहारात असणे फार चांगले असते. अनेक पौष्टिक पदार्थांपैकी शेंगदाणे एक आहे. (Roasted peanuts are delicious - good for your health - protein snacks) आपल्याला अशा साध्या रोजच्या पदार्थांचे महत्व माहितीच नसते. शेंगदाणे आवडीने खात असाल तर ते नक्कीच पोषक ठरतात.

आहारात शेंगदाण्यांचा समावेश नसेल तर तो नक्कीच करुन घ्यावा. काही आरोग्यदायी फायदे शेंगदाणे खाल्याने मिळतात. शेंगदाण्यांमुळे पित्त वाढते म्हणून आपण ते खाणे टाळतो. मात्र शेंगदाणे अति खाल्यानेच पित्ताचा त्रास होतो. कोणताही पदार्थ जास्त खाणे आरोग्यसाठी वाईटच. त्यामुळे शेंगदाणे बेताने आणि प्रमाणात नक्की खावे. 

शेंगदाण्यात भरपूर प्रथिने असतात. तसेच फायबर असते. त्यात निरोगी फॅट्स असतात. वजन कमी करण्यासाठीच्या डाएटमध्येही शेंगदाणे उपयुक्त ठरतात. शेंगदाण्याचा वापर करुन विविध पदार्थ तयार करु शकता. शेंगदाण्याचे तेल घरी वापरु शकता. अरबटचटरबट खायची इच्छा झाली की चिप्स वगैरे पेक्षा शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते.

शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण शेंगदाण्यामुळे वाढत नाही. मधुमेहाचा त्रास आजकाल फार कॉमन झाला आहे. साखरेची पातळी नियंत्रित राहावी यासाठी शेंगदाण्याची मदत होते. शेंगदाण्यांमध्ये व्हिटामिन (B1) थायमिन आणि नियासिन (B3) असते, जे मेंदूच्या कार्यासाठी फार आवश्यक आहेत. स्मरणशक्ती चांगली राहावी आणि मेंदू तल्लख राहावा यासाठी शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते.  

शेंगदाण्यात मॅग्नेशियम असते. त्यात फॉस्फरस असते तसेच झिंक असते. त्यामुळे हाडांसाठीही शेंगदाणे चांगले. शेंगदाण्याच्या तेलाने मालीश केली जाते. त्याचे कारणही हेच आहे. शेंगदाण्यांमध्ये रेस्व्हेराट्रॉल, फ्लावोनॉइड्स आणि व्हिटामिन 'इ' सारखे अँटी ऑक्सिडंट्स असतात. शरीरासाठी ते फायद्याचे असतात. तसेच अँटी ऑक्सिडंट्स केसांसाठी व त्वचेसाठीही उपयुक्त ठरतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Roasted Peanuts: Delicious, Healthy, and Affordable Protein Snack Benefits

Web Summary : Roasted peanuts are a nutritious snack, rich in protein, fiber, and healthy fats. They aid weight management, control blood sugar, boost brain function, and strengthen bones due to magnesium, phosphorus, and zinc. Antioxidants promote healthy skin and hair. Enjoy in moderation for optimal health benefits.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्स