कांदा हा आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच लोकांना कच्चा कांदा खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, कच्चा कांदा खाल्ल्याने आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. अन्नाची चव वाढवणारा कांदा आपल्याला आजारी देखील पाडू शकतो. कच्चा कांदा खाण्याचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊया...
पोट आणि पचनावर परिणाम
कच्चा कांदा खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन होऊ शकतं. त्यात फायबर असतं, परंतु काही लोकांसाठी त्यामुळे अस्वस्थ वाटतं. जर तुम्हाला आधीच पोटात गॅस्ट्रिक किंवा अॅसिडिटी सारखी कोणतीही समस्या असेल तर कच्चा कांदा ही समस्या वाढवू शकतो.
अॅलर्जी आणि त्वचेची समस्या
काही लोकांना कांद्याची अॅलर्जी असू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणं किंवा सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कांदा खाल्ल्यानंतर शरीरात कोणतीही अजब रिएक्शन दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. जर तुम्ही अशा समस्यांकडे लक्ष दिलं नाही तर नंतर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.
तोंडाला दुर्गंधी
कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येणं सामान्य आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा मित्रांसोबत असाल तर यामुळे थोडीशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करू शकते. म्हणून ऑफिसमध्ये किंवा मित्रांसोबत जाताना कच्चा कांदा खाऊ नका.
ब्लड शुगरवर परिणाम
कच्चा कांदा खाल्ल्याने ब्लड शुगरमध्ये अचानक चढ-उतार होऊ शकतात. मधुमेही रुग्णांनी हे लक्षात ठेवावं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाऊ नये.
हृदय आणि ब्लड प्रेशर
कांद्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यदायी असतात, परंतु जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने काही लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास किंवा हृदयाचे ठोके प्रभावित होऊ शकतात.
जर तुम्हाला कांदा खायचा असेल तर भाजलेला किंवा हलका शिजवलेला कांदा खाणं अधिक सुरक्षित आहे. तो आरोग्यासाठी देखील चांगला असतो. याशिवाय जर तुम्ही कच्चा कांदा खाल्ला तर तो अगदी मर्यादित प्रमाणात खा, जसं की तुम्ही सॅलडमध्ये वापरू शकता, यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहाल.