नाश्त्याला काहीतरी हलकं फुलकं, पौष्टीक आणि झटपट बनवता येणारा पदार्थ म्हणजे रवा-बेसन ढोकळा. हा ढोकळा नाश्त्याला उत्तम पर्याय आहे. हा ढोकळा जाळीदार, मऊ आणि चवीला एकदम उत्कृष्ट लागतो. बेसन आणि रवा यांचे मिश्रण असल्यामुळे या ढोकळ्याला छान टेक्सचर येते (Easy Rice Of Rava Besan Dhokla). अचानक पाहूणे आले तर त्यांना नाश्ता देण्यासाठी, मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा ढोकळा उत्तम आहे. आंबट-गोड फोडणीमुळे याची चव अधिकच वाढते. हा परफेक्ट जाळीदार रवा बेसन ढोकळा कसा करायचा पाहूया. (How To Make Rava Besan Dhokla)
ढोकळा करण्याची खास रेसिपी
एका मोठ्या भांड्यात बेसन आणि रवा एकत्र करा. त्यात दही, ताक, आलं-मिरची पेस्ट, हळद, साखर आणि मीठ घालून एकजीव करा. गरजेनुसार पाणी घालून गुठळ्या न होतात मध्यम जाडीचे बॅटर तयार करा. ढोकळ्याचे बॅटर इडलीच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट असावं. हे मिश्रण किमान १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. जेणेकरून रवा फुगेल.
ढोकळा शिजवण्याच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्या.शिजवण्यापूर्वी लगेच तयार बॅटरमध्ये इनो फ्रुट सॉल्ट घालून त्यावर १ चमचा पाणी घाला. इनो सक्रीय झाल्यानंतर बॅटर हलकं होईपर्यंत एकाच दिशेनं पटकन ढवळून घ्या.
कमी ग्रॅम सोन्यात घ्या नाजूक कानातले; १० लाईटवेट डिजाईन्स, रोज वापरायला उत्तम पर्याय
इनो घातलेलं बॅटर लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओता. प्लेट गरम झालेल्या भांड्यात ठेवून झाकण लावा आणि मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटं वाफेवर शिजवा.ढोकळा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरी टोचून बघा. सुरी स्वच्छ बाहेर आल्यास ढोकळा तयार आहे.
ढोकळा ताटातून बाहेर काढून थंड करून घ्या आणि त्याचे हव्या त्या आकारात तुकडे करा. एका लहान कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहोरी, तीळ आणि कढीपत्ता व हिरवी मिरची घाला.
ब्लाऊजचे १० ट्रेंडीग पॅटर्न, पुढचा गळा टिपिकल गोल शिवणं विसरा, पाहा नवीन डिझाइन्स
दीड चमचे साखर घालून विरघळवून घ्या आणि ही साखर पाण्याची फोडणी गरम तेलात घाला. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. ही गरम फोडणी ढोकळ्याच्या तुकड्यांवर समान पसरवा. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीनं सजवा आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम ढोकळा सर्व्ह करा.
