Lokmat Sakhi >Food > कोबीची भाजी कायमची विसराल इतकी भारी लागते ‘कोबीची पचडी!’ महागड्या सॅलेडपेक्षा सरस आणि पौष्टिक

कोबीची भाजी कायमची विसराल इतकी भारी लागते ‘कोबीची पचडी!’ महागड्या सॅलेडपेक्षा सरस आणि पौष्टिक

Quick recipe: Cabbage Pachadi, a nutritious and tasty salad that is a must-have in your diet : पौष्टिक कोबी पचडी आहारात असणे ठरेल फायद्याचे. चवीला मस्त करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 08:55 IST2025-06-11T08:50:20+5:302025-06-11T08:55:01+5:30

Quick recipe: Cabbage Pachadi, a nutritious and tasty salad that is a must-have in your diet : पौष्टिक कोबी पचडी आहारात असणे ठरेल फायद्याचे. चवीला मस्त करायला सोपी.

Quick recipe: Cabbage Pachadi, a nutritious and tasty salad that is a must-have in your diet | कोबीची भाजी कायमची विसराल इतकी भारी लागते ‘कोबीची पचडी!’ महागड्या सॅलेडपेक्षा सरस आणि पौष्टिक

कोबीची भाजी कायमची विसराल इतकी भारी लागते ‘कोबीची पचडी!’ महागड्या सॅलेडपेक्षा सरस आणि पौष्टिक

आपण अनेक प्रकारच्या कोशिंबीर करतो. चवीला छान असतात आणि अगदी पौष्टिक असतात. (Quick recipe: Cabbage Pachadi, a nutritious and tasty salad that is a must-have in your diet)अशीच एक रेसिपी म्हणजे कोबीची पचडी. काही जण पचडी म्हणतात तर काही जण कोशिंबीर. करायला अगदी सोपी आहे आणि झटपट होते. पाहा काय करायचे. 

साहित्य
कोबी, नारळ, कोथिंबीर, मीठ, दाण्याचे कुट, तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता, हिंग, हळद, साखर, लिंबाचा रस 

कृती
१. कोबी बारीक किसून घ्यायचा. कच्चा कोबीच घ्यायचा आहे. कोबी किसून झाल्यावर एका वाडग्यात किंवा खोलगट भांड्यात काढून घ्यायचा. कोबीला आधी मीठ लावायचे नाही. तसे केल्यामुळे पाणी सुटते. काही जण सगळ्यात आधी मीठ घालतात. तसे केल्यामुळे मग पचडी पातळ होते. आणि पाणचट लागते. 

२. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची. कोथिंबीर निवडायची. त्यानंतर स्वच्छ धुवायची. धुऊन झाल्यावर बारीक चिरायची. ताजा नारळ घ्यायचा. नारळ खवायचा. शेंगदाण्याचे कुट तयार करुन घ्यायचे. त्याची साले काढून टाकायची. 

३. किसलेल्या कोबीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यात दाण्याचे कुट घालायचे. छान खवलेला नारळ घालायचा. सगळे पदार्थ एकजीव करायचे. छान मिक्स करायचे. त्यात लिंबाचा रस पिळायचा. चमचाभर साखर घालायची. पचडी छान एकजीव करायची.   

४. पचडीमध्ये फोडणी घातल्यावर तिची चव एकदम मस्त लागते. त्यासाठी साधीच फोडणी तयार करायची. एका फोडणीपात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल जरा गरम करायचे. मग त्यात चमचाभर हिंग घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरे फुलल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. मग गॅस बंद केल्यावर चमचाभर हळद घालायची. फोडणी गरमागरम असतानाच लगेच पचडीवर ओतायची. 

५. सगळ्यात शेवटी थोडे मीठ घालायचे. मग पचडी व्यवस्थित कालवून घ्यायची. सगळीकडे फोडणी सारखी लागेल याची काळजी घ्यायची. चपाती, भाकरी , भात सगळ्यासोबत खाऊ शकता. नुसती खायलाही मस्त लागते. तेल न घालता चमचाभर तूप घेतले तरी चालेल.       

Web Title: Quick recipe: Cabbage Pachadi, a nutritious and tasty salad that is a must-have in your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.