Join us

बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स घरीच करा; सोपी पद्धत, एकदा खाल तर खातच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 20:00 IST

Potato Skin Chips (batatyachya saliche chips kase karatat) : मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी हे चिप्स उत्तम आहे ५ ते १० मिनिटांत हे  चिप्स बनवून होतील. 

बटाटा प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात असतो. (Potato Peel  Chips) बटाट्याची भाजी, बटाट्याचे चिप्स किंवा खिचडीत बटाटा घालताना आपण आधी सालं काढून घेतो मग बटाटा वापरतो.  (Potato Skin Chips) बटाट्याची सालं नेहमीच फेकून दिली जातात. बटाट्याची सालं फेकण्याच्यापेक्षा तुम्ही याचे कुरकुरीत चिप्स बनवू शकता. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी हे चिप्स उत्तम आहे ५ ते १० मिनिटांत हे  चिप्स बनवून होतील. (How to Make Potato Skin Chips)

बटाट्याच्या सालीचे चिप्स करण्यासाठी लागणारं साहित्य (How to make potato peel chips at home)

1) बटाट्याची सालं- २ वाट्या

2) मीठ- १ ते २ चमचे

3) काळी मिरी- १ ते २ चमचे

4) लाल मिरची- १ ते २

5) काळं मीठ- चवीनुसार

6) तेल- गरजेनुसार

बटाट्याच्या सालीचे चिप्स कसे बनवावेत? (Potato peel Chips recipe)

१) बटाट्याच्या सालीचे चिप्स बनवण्यासाठी नेहमी अशा सालीची निवड करा  ज्यावर कोणतेही डाग नसतील. बटाटे सोलून सालं एका ताटात काढून घ्या. साली लांब लांब असतील असे पाहा. कारण छोट्या सालीचे चिप्स न करता मोठ्या सालीचे चिप्स बनवल्यास आकार चांगला दिसतो.

२) बटाट्याची सालं  स्वच्छ धुवून घ्या. यासाठी तुम्ही चाळणीचा वापर करून शकता. चाळणीत बटाट्याची सालं घालून व्यवस्थित धुवून  घ्या. धुवून घेतलेल्या साली पंख्याच्या हवेखाली किंवा उन्हात सुकवून घ्या.

डोक्यावर पांढरे केस जास्त चमकतात? किचनमधला हा पदार्थ वापरा-एकही केस पांढरा होणार नाही

३) एक ट्रे घेऊन त्यात बेकींग पेपर पसरवा. बटाट्याची सालं या पेपरवर पसरवून घ्या. त्यावर बटाट्याच्या साली घालून ट्रे फिजरमध्ये ठेवून द्या. १ तासानंतर फ्रिजमधून काढून त्यात ऑलिव्ह ऑईल,  मीठ, मिरची, काळी मिरी, काळे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

४) बेकिंग ट्रे मध्ये मिसळून ही सालं बेक करण्यासाठी ठेवा. हवंतर तुम्ही ही सालं डिप फ्रायही करू शकता. या साली चटणी, सॉस किंवा मायोनीजबरोबर तुम्ही सर्व्ह करु शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती