बटाट्याचे पराठे हा घरातल्या बहुतांश मंडळींचा अतिशय आवडीचा पदार्थ. नाश्त्यामध्ये, डब्यामध्ये किंवा अगदी रात्री जेवणामध्येही अनेकांना बटाट्याचे पराठे चालतात. लहान मुलं तर बटाट्याचे पराठे असल्यावर विशेष खूश असतात. म्हणूनच आता त्यांच्यासाठी बटाट्याच्या पराठ्यासारखाच पण थोडा वेगळा प्रकार करून पाहा. बटाट्याचे धिरडे हा एक मस्त पदार्थ असून चवीला उत्तम आणि करायला सोपा आहे. सकाळच्या वेळी डब्यातही तुम्ही अगदी झटपट बटाट्याचे पराठे करून देऊ शकता (Potato Dhirada Recipe). ते नेमके कसे करायचे ते पाहूया.(how to make batatyacha dhirada?)
बटाट्याचे पराठे करण्याची रेसिपी
साहित्य
२ मध्यम आकाराचे बटाटे
१ वाटी गव्हाचे पीठ
३ ते ४ हिरव्या मिरच्या
५ ते ६ लसूण पाकळ्या
१ टेबलस्पून कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
चवीनुसार मीठ आणि जिरेपूड
कृती
सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या आणि त्याची सालं काढून घ्या.
हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
यानंतर बटाटे मॅश करून घ्या. एका भांड्यामध्ये मॅश केलेले बटाटे, गव्हाचं पीठ, मिरच्या, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घाला.
त्यात चवीनुसार मीठ, जिरेपूड घालून अर्ध्या लिंबाचा रस पिळा. यानंतर गरजेनुसार पाणी घालून पीठ सैलसर कालवून घ्या.
वजन आयुष्यभर राहील कंट्रोलमध्ये! फक्त २ गोष्टी नियमित करा- वजन वाढण्याची चिंता विसरा
यानंतर डाेसा करण्याचा तवा घ्या. तो गरम झाला की त्याला तेल लावा आणि डोसा करण्यासाठी तव्यावर पीठ टाकतो, तसंच पीठ तव्यावर घालून पसरवून घ्या. २ मिनिटे त्यावर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच ठेवावी. दोन्ही बाजूनी धिरडं खमंग भाजून घ्यावं.