Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पचन सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी - नाश्त्याला मुळ्याचे पराठे, पोट साफ ठेवण्याचा चविष्ट मार्ग

पचन सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी - नाश्त्याला मुळ्याचे पराठे, पोट साफ ठेवण्याचा चविष्ट मार्ग

Perfect recipe to improve digestion - Radish parathas for breakfast, a delicious way to keep your stomach clean : मुळ्याचे पराठे म्हणजे चवही आणि पोषणही. लगेच पोट होते साफ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2025 11:27 IST2025-11-16T11:25:57+5:302025-11-16T11:27:02+5:30

Perfect recipe to improve digestion - Radish parathas for breakfast, a delicious way to keep your stomach clean : मुळ्याचे पराठे म्हणजे चवही आणि पोषणही. लगेच पोट होते साफ.

Perfect recipe to improve digestion - Radish parathas for breakfast, a delicious way to keep your stomach clean | पचन सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी - नाश्त्याला मुळ्याचे पराठे, पोट साफ ठेवण्याचा चविष्ट मार्ग

पचन सुधारण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी - नाश्त्याला मुळ्याचे पराठे, पोट साफ ठेवण्याचा चविष्ट मार्ग

आहारात मुळा असावा. मुळ्यात पचन सुधारण्यासाठी मदत करणारे फायबर, शरीराला ताजेतवाने ठेवणारे जीवनसत्त्व सी, तसेच हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. (Perfect recipe to improve digestion - Radish parathas for breakfast, a delicious way to keep your stomach clean)याशिवाय त्यात पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो. मुळ्यात फोलेट, जीवनसत्त्व बी६, फॉस्फरस, अँटी ऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणीही असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. मुळा असाच खायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे मुळ्याचे असे पराठे करा. चवीला एकदम मस्त असतात. नक्कीच आवडतील. 

साहित्य 
मुळा, तेल, हिरवी मिरची, लाल तिखट, पाणी, गव्हाचे पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, धणे- जिरे पूड

कृती
१. आधी पीठ मळून घ्यायचे. म्हणजे ते थोडावेळ सेट करत ठेवता येते. गव्हाचे पीठ घ्यायचे. कोमट पाण्यात मळायचे. पोळ्यांसाठी जसे पीठ मळता तसेच मध्यम घट्ट पीठ मळायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. निवडायची आणि बारीक चिरायची.  

२. मुळा सोलायचा. टोकं चिरायची. नंतर मुळा मस्त किसून घ्यायचा. एका खोलगट पातेल्यात घ्यायचा. त्यात चमचाभर मीठ घालायचे आणि मुळा हाताने फिरवत राहायचा. त्याला पाणी सुटले की मुळ्याचे पाणी काढून घ्यायचे. अगदीच चोथा करु नका मात्र सुका करा. सुका नसेल तर पराठा लाटला जाणार नाही. 

३. मुळा सुका केल्यावर त्यात चवी पुरते मीठ घाला. चमचाभर लाल तिखट घाला. तसेच चमचाभर हळदही घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. चमचाभर लाल तिखट घालायची. चमचाभर धणे-जिरे पूड घालायची. सारण छान मळून घ्यायचे. 

४. पिठाच्या लाट्या तयार करायच्या. मध्यम आकाराच्या लाट्या करा. त्यात सारण भरायचे. लाटी व्यवस्थित बंद करायची. त्याला पीठ लावायचे आणि लाटायला घ्यायची. जरा मध्यम जाड लाटायची. तवा गरम करायचा आणि त्यावर थोडे तेल घालायचे. तेलावर पराठा लावायचा. पराठा दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायचा. गरमागरम पराठा चटणी सॉस किंवा एखाद्या भाजीशी खा. 
 

Web Title : मूली का पराठा: पाचन के लिए स्वादिष्ट और सेहतमंद नाश्ता

Web Summary : मूली का पराठा पाचन को बढ़ावा देने का एक स्वादिष्ट तरीका है। मूली फाइबर, विटामिन और खनिजों से भरपूर होती है। इस रेसिपी में मूली को कद्दूकस करके मसालों के साथ मिलाया जाता है और फिर इसे गेहूं के आटे में भरकर पराठा बनाया जाता है, जो एक स्वस्थ और स्वादिष्ट नाश्ता है।

Web Title : Radish Paratha: A Delicious Recipe for Improved Digestion and Gut Health

Web Summary : Radish paratha is a tasty way to boost digestion. Radishes are rich in fiber, vitamins, and minerals. The recipe involves grating radish, mixing it with spices, and stuffing it into whole wheat dough for a healthy and flavorful breakfast.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.