lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

Perfect Idli Dosa Batter for Soft Idlis and Super Crispy Dosas : इडली-डोश्याचं बॅटर तयार करताना प्रमाण चुकलं, तर संपूर्ण गणित बिघडतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 02:20 PM2024-04-19T14:20:28+5:302024-04-19T15:36:07+5:30

Perfect Idli Dosa Batter for Soft Idlis and Super Crispy Dosas : इडली-डोश्याचं बॅटर तयार करताना प्रमाण चुकलं, तर संपूर्ण गणित बिघडतं..

Perfect Idli Dosa Batter for Soft Idlis and Super Crispy Dosas | इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

सकाळचा नाश्ता महत्वाचा असतो. नाश्ता केल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Idli-Dosa). शिवाय हेल्दी नाश्ता केल्याने आपल्या शरीराला पौष्टीक घटक मिळतात. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, चपाती-भाजी खाल्ली जाते. जर या पदार्थांचा कंटाळा आला तर, आपण साऊथ इंडिअन किंवा गुजराथी पदार्थ खातो. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, उतप्पा, मेदू वडे, अप्पे हे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात (Cooking Tips). हे पदार्थ खाल्ल्याने दिवसभर भूक लागत नाही.

शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. पण घरात अण्णाच्या ठेल्यावर मिळते तशी इडली, डोसे तयार होत नाही. किंवा उन्हाळ्यात पीठ व्यवस्थित फरमेण्ट होत नाही.  जर आपल्याला घरात लुसलुशीत इडल्या करायच्या असतील तर, एक ट्रिकचा वापर करा. पीठ व्यवस्थित आंबेल. इडली-डोसा परफेक्ट तयार होतील(Perfect Idli Dosa Batter for Soft Idlis and Super Crispy Dosas).

इडलीचं बॅटर करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

तांदूळ

विड्याचे पान

साबुदाणा

मिक्सरच्या भांड्यात कोण ढोकळा करते? पाहा ही युक्ती, करा जाळीदार हलका ढोकळा

मीठ

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप जाड तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळ-तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात एक मोठा चमचा साबुदाणा घाला.

साहित्य धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवा. ६ ते ७ तासांसाठी साहित्य भिजत ठेवा. ७ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ काढून वाटून घ्या.

वाटलेलं बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या. जर बॅटर व्यवस्थित फरमेण्ट होत नसेल तर, त्यात एक विड्याचे पान घाला, आणि ६ ते ७ तासांसाठी त्यावर झाकण ठेऊन बॅटर फरमेण्ट होण्यासाठी ठेवा. ७ तासानंतर बॅटर व्यवस्थित फुलेल, आपण त्यात चवीनुसार मीठ घालून इडल्या तयार करू शकता.

डोश्याचं बॅटर करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

तांदूळ

मेथी दाणे

पोहे

चणा डाळ

कृती

डोश्याचं बॅटर करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ घ्या. डाळ-तांदुळामध्ये पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात एक चमचा मेथी दाणे, एक चमचा पोहे आणि एक चमचा चणा डाळ घालून मिक्स करा.

रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी

नंतर त्यात पाणी घालून त्यावर ६ ते ७ तासांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून डाळ-तांदूळ व्यवस्थित भिजेल. ७ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात साहित्य काढून घ्या. नंतर त्यात थंड पाणी घालून वाटून घ्या. थंड पाण्यामुळे डाळ-तांदुळाची गुळगुळीत पेस्ट तयार होईल. 

तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून घ्या. बॅटर व्यवस्थित आंबवण्यासाठी त्यात २ ओव्याची पानं घाला, ६ ते ७ तासांसाठी बॅटर आंबवण्यासाठी रूम टेम्प्रेचरवर ठेवा. ७ तासानंतर बॅटरमधून पान बाहेर काढा. त्यात चवीनुसार मीठ घालून डोसा तयार करायला घ्या. अशा प्रकारे हॉटेलस्टाईल क्रिस्पी डोसा रेडी होईल. 

Web Title: Perfect Idli Dosa Batter for Soft Idlis and Super Crispy Dosas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.