lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कपभर हिरव्या मुगाला द्या पाकिस्तान स्टाईल तडका, पाहा त्यांची डाळ करण्याची युनिक पद्धत, चवीला भारी-खाल पोटभर

कपभर हिरव्या मुगाला द्या पाकिस्तान स्टाईल तडका, पाहा त्यांची डाळ करण्याची युनिक पद्धत, चवीला भारी-खाल पोटभर

Pakistani Tadka Dal Recipe | Quick Daal Tadka : पाकिस्तानी पद्धतीची डाळ तडका कधी खाऊन पाहिलं आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2023 12:09 PM2023-12-06T12:09:44+5:302023-12-06T12:10:34+5:30

Pakistani Tadka Dal Recipe | Quick Daal Tadka : पाकिस्तानी पद्धतीची डाळ तडका कधी खाऊन पाहिलं आहे का?

Pakistani Tadka Dal Recipe | Quick Daal Tadka | कपभर हिरव्या मुगाला द्या पाकिस्तान स्टाईल तडका, पाहा त्यांची डाळ करण्याची युनिक पद्धत, चवीला भारी-खाल पोटभर

कपभर हिरव्या मुगाला द्या पाकिस्तान स्टाईल तडका, पाहा त्यांची डाळ करण्याची युनिक पद्धत, चवीला भारी-खाल पोटभर

प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. भारतात चपाती-भाजी आणि डाळ-भाताला (Daal Tadka) अधिक प्राधान्य दिले जाते. चपाती-भाजी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरतेच, शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. डाळ फक्त भारतात (India) नसून, विविध देशांमध्येही केली जाते. ज्यात पाकिस्तान (Pakistan) या देशाचा देखील समावेश आहे. पाकिस्तानात डाळ-भात केला जातो, पण त्यांची डाळ करण्याची पद्धत ही थोडी वेगळी आहे.

डाळीला तडका देण्याची त्यांची स्पेशल पद्धत आहे. शिवाय डाळ करण्यासाठी तिकडची लोकं मुगाच्या डाळीचा वापर करतात. जर आपल्याला मुग डाळ आवडत नसेल तर, आपण इतरही डाळींचा वापर करू शकता (Cooking Tips). डाळींमध्ये प्रोटीनसह इतरही पौष्टीक घटक असतात. जे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. जर एकाच प्रकारची डाळ तडका खाऊन कंटाळा आला असेल तर, डाळीला पाकिस्तानी स्टाईल तडका देऊन पाहा(Pakistani Tadka Dal Recipe | Quick Daal Tadka ).

पाकिस्तानी स्टाईल डाळ तडका करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे अख्खे मुग

कांदा

फिटनेस फ्रिक विद्युत जामवाल वजन कमी करण्यासाठी खातो मुरमुऱ्याची भेळ! वाचा तो काय म्हणतो..

आलं-लसूण पेस्ट

लाल तिखट

चिली फ्लेक्स

मिरे पूड

धणे पूड

जिरे पूड

मीठ

गरम मसाला

हळद

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ कप हिरवे मूग घ्या. त्यात २ कप पाणी घालून मुग स्वच्छ धुवून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये अख्खे मुग, ३ कप पाणी, एक बारीक चिरलेला कांदा, एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टेबलस्पून मिरे पूड, एक टेबलस्पून धणे पूड, एक टेबलस्पून जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करा.

कोकणी पद्धतीची मऊसूत आंबोळी करायची आहे? साहित्य वाटताना त्यात मिसळा एक सिक्रेट गोष्ट, आंबोळ्या होतील परफेक्ट..

नंतर प्रेशर कुकरचं झाकण लावा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. ३ शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करा. नंतर त्यात अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा टेबलस्पून हळद घालून मिक्स करा. फोडणीच्या पळीत २ टेबलस्पून तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून फोडणी डाळीवर ओतून मिक्स करा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे पाकिस्तानी स्टाईल डाळ तडका खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Pakistani Tadka Dal Recipe | Quick Daal Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.