कितीही काटेकोर नियोजन केलं तरी कधीतरी असं होतंच की घरात कोणतीच भाजी नसते. कधी आपलं बाजारात जाणं होत नाही तर कधी आपला नेहमीचा भाजीवाला किंवा भाजीवाली येतच नाही.. त्यामुळे मग आपले नेहमीचे हक्काचे कांदे, टोमॅटो आणि बटाटे सोडले तर घरात दुसरी कोणतीच भाजी नसते. कांदा- बटाटा किंवा कांदा- टोमॅटो अशा त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊनही कंटाळा येतो. म्हणूनच आता ही एक एकदम वेगळी रेसिपी बघून घ्या (onion chutney recipe in just 5 minutes). घरात कांद्यांशिवाय जेव्हा इतर कोणतीच भाजी नसेल तेव्हा ही कांद्याची चटणी नक्कीच तुमच्या जेवणाला रंगत आणेल.(delicious recipe of onion chutney or sabji)
कांद्याची चटणी करण्याची रेसिपी
अतिशय झटपट आणि खूपच मोजकं साहित्य वापरून कांद्याची चटणी किंवा भाजी कशी तयार करायची याची रेसिपी yogitas_kitchen_magic या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
३ ते ४ मध्यम आकाराचे कांदे
पावसाळ्यात इडलीचं पीठ लवकर आंबत नाही? ३ टिप्स- इडल्या टम्म फुगून कापसासारख्या मऊ होतील
२ चमचे शेंगदाण्याचा कूट
५ ते ६ लसूण पाकळ्या
३ ते ४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबी
१ चमचा तेल
चवीनुसार तिखट आणि मीठ
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
सगळ्यात आधी कांद्याचे टरफल काढून ते बारीक चिरून घ्या. या रेसिपीसाठी कांदा बारीक चिरावा.
यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि ती देखील अगदी बारीक चिरून घ्या. तसेच लसूण पाकळ्याही ठेचून घ्या.
अंडरआर्म्स, हाताचे कोपरे काळवंडले? १ चमचा मसूर डाळ घेऊन 'हा' उपाय करा- टॅनिंग गायब
आता बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण पाकळ्या एका भांड्यामध्ये एकत्र करा. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ घाला आणि शेंगदाण्याचा कूट घाला.
आता एक छोटी कढई घ्या. त्या कढईमध्ये तेल अगदी कडक तापवून घ्या. आता कडक तापलेलं तेल कांद्यावर घाला आणि थोडं लिंबूही पिळा. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले की झाली तयार कांद्याची चटकदार चटणी. ही चटणी पोळी, भाकरी, पराठ्यासोबत अगदी उत्तम लागेल.