Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > लालेलाल पौष्टिक कमाल! खा लालचुटूक कुरकुरीत टोमॅटो डोसा, आंबट तिखट चवीचा झणझणाट-पाहा रेसिपी

लालेलाल पौष्टिक कमाल! खा लालचुटूक कुरकुरीत टोमॅटो डोसा, आंबट तिखट चवीचा झणझणाट-पाहा रेसिपी

Nutritious superfood recipe! Eat this delicious crispy tomato dosa, with a tangy, sour and spicy taste - see the recipe : टोमॅटो डोसा करा घरीच चविष्ट नाश्ता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 14:27 IST2026-02-12T14:26:39+5:302026-02-12T14:27:42+5:30

Nutritious superfood recipe! Eat this delicious crispy tomato dosa, with a tangy, sour and spicy taste - see the recipe : टोमॅटो डोसा करा घरीच चविष्ट नाश्ता.

Nutritious superfood recipe! Eat this delicious crispy tomato dosa, with a tangy, sour and spicy taste - see the recipe | लालेलाल पौष्टिक कमाल! खा लालचुटूक कुरकुरीत टोमॅटो डोसा, आंबट तिखट चवीचा झणझणाट-पाहा रेसिपी

लालेलाल पौष्टिक कमाल! खा लालचुटूक कुरकुरीत टोमॅटो डोसा, आंबट तिखट चवीचा झणझणाट-पाहा रेसिपी

भारतात विविध प्रकारचे डोसे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. दक्षिण भारतातील हा पदार्थ आज देशभर लोकप्रिय झाला आहे. नाश्त्यासाठी हलका, पचायला सोपा आणि चवीला उत्तम असल्यामुळे डोसा सर्व वयोगटांतील लोकांना आवडतो. शिवाय पोटभरीचा आणि परवडणारा पदार्थ आहे. साधा डोसा आणि मसाला डोसा हे सर्वात प्रसिद्ध प्रकार आहेत. कुरकुरीत डोसा, त्यात बटाट्याची भाजी आणि सोबत सांबार-चटणी ही अनेकांची आवडती जोडी. रवा डोसा, मैसूर डोसा आणि पेपर डोसा यांसारखे प्रकारही तितकेच लोकप्रिय आहेत. (Nutritious superfood recipe! Eat this delicious crispy tomato dosa, with a tangy, sour and spicy taste - see the recipe)आजकाल आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी ज्वारी, नाचणी, ओट्स किंवा मल्टीग्रेन डोसेही उपलब्ध आहेत. तसेच चीज, पनीर किंवा विविध फ्युजन फ्लेवर्सचे डोसेही लोक चवीने खातात. पण कधी तुम्ही टोमॅटो डोसा खाल्ला का? मस्त लाल असा हा डोसा चवीला आंबट - तिखट लागतो. एकदम मस्त प्रकार आहे. नक्की खाऊन पाहा.  

साहित्य 
टोमॅटो, मीठ, आलं, लाल तिखट, पाणी, रवा, तांदूळ पीठ, तेल, जिरं, कांदा

कृती
१. टोमॅटोचे तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात आल्याचा तुकडा घालायचा. तसेच चमचाभर मीठ घालायचे. नंतर थोडं लाल तिखट घालायचं. त्याची पेस्ट तयार करायची. मस्त एकजीव वाटून घ्यायचे. एका खोलगट पातेल्यात काढून घ्यायचे आणि नंतर त्यात पाणी घालायचे. जास्त पातळ करु नका. नीट ढवळल्यावर त्यात थोडं तांदूळाचं पीठ घालायचं, तसेच रवा घालायचा. छान मिक्स करायचं. त्यात पाणी घालायचं आणि किमान वीस मिनिटांसाठी ठेवायचं. 

२. वीस मिनिटांत रवा छान फुलतो. मग मिश्रण ढवळा आणि पाण्याचा अंदाज घ्या. रवा डोसा करण्यासाठी जसे पातळ पीठ तयार करता अगदी तसेच करायचे आहे. कांदा बारीक चिरायचा. मिश्रणात कांदा घालायचा आणि जिरंही घालायचं. मिक्स करायचं. 

३.  तव्याला तेल लावायचे. तवा छान तापल्यावर तयार मिश्रण जरा वरतून तव्यावर ओतायचे. छान पसरवून घ्यायचे. पातळच थर लावायचा. मधून तेल सोडायचे. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतायचा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाला की गरमागरम डोसा आवडत्या चटणीसोबत खा. 
 

Web Title : खट्टा टमाटर डोसा: एक कुरकुरा, मसालेदार और पौष्टिक आनंद!

Web Summary : टमाटर डोसा, एक दक्षिण भारतीय पसंदीदा, अब एक लोकप्रिय व्यंजन है। यह खट्टा, मसालेदार और कुरकुरा रूप एक अनोखा स्वाद प्रदान करता है। रेसिपी में टमाटर को मसालों के साथ मिलाना, चावल के आटे और सूजी के साथ मिलाना और सुनहरा भूरा होने तक पकाना शामिल है। चटनी के साथ गरमागरम परोसें।

Web Title : Tangy Tomato Dosa: A Crispy, Spicy, and Nutritious Delight!

Web Summary : Tomato dosa, a South Indian favorite, is now a popular dish. This tangy, spicy, and crispy variation offers a unique twist. The recipe involves blending tomatoes with spices, mixing with rice flour and semolina, and cooking until golden brown. Serve hot with chutney.