lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ना सोडा, ना इनो - ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी

ना सोडा, ना इनो - ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी

Easy recipe for soft-puffed dhokla (Dhokla Kasa Banvtat) : ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी खर्चात कमीत  कमी साहित्यात तुम्ही मऊसूत ढोकळा बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:36 AM2024-05-15T10:36:00+5:302024-05-15T16:09:04+5:30

Easy recipe for soft-puffed dhokla (Dhokla Kasa Banvtat) : ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी खर्चात कमीत  कमी साहित्यात तुम्ही मऊसूत ढोकळा बनवू शकता.

No soda No lemon Make perfect dhokla in 3 minutes Easy recipe for soft-puffed dhokla | ना सोडा, ना इनो - ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी

ना सोडा, ना इनो - ३ मिनिटांत घरीच करा परफेक्ट ढोकळा; मऊ-फुललेल्या ढोकळ्याची सोपी रेसिपी

नाश्त्याला (Breakfast) ढोकळा खायला सर्वांनाच आवडते. (Cooking Tips) ढोकळा खाऊन बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि ढोकळा एक लो कॅलरी फूड आहे. (How To Make Dhokla in Just 3 Mins)  बाजारातून ढोकळा विकत आणून खाणं नेहमीच योग्य नसते काही वेळा तुम्ही घरच्याघरीसुद्धा परफेक्ट फुललेला ढोकळा बनवू शकता. ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही. कमीत कमी खर्चात कमीत  कमी साहित्यात तुम्ही मऊसूत ढोकळा बनवू शकता. (Easy recipe for soft-puffed dhokla)

ढोकळा करण्याची सोपी पद्धत कोणती  (How To Make Dhokla At Home)

सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात २ कप भरून बेसन घाला. त्यात २ ते ३ चमचे हळद घाला, त्यात १ छोटा चमचा साखर घाला आणि १ चमचा तेल घाला. (Dhokla Recipe) तेल घातल्याने ढोकळ्याला मॉईश्चचर येतं आणि चव चांगली लागते. त्यात आल्याचे तुकडे घाला आणि चवीनुसार मीठ घाला. (How to Make Dhokla)

सोड्याऐवजी ढोकळ्याच्या मिश्रणात १ चमचा लिंबू पावडर घाला. त्यात १ कप पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या.  मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. ढोकळ्याचे मिश्रण २ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घ्या. (Dhokla Making Steps)

तडका देण्यासाठी हिरव्या मिरच्या चिरून घ्या, कढईत तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात राई, कढीपत्ता, घालून चमच्याच्या साहाय्याने चाळून घ्या. पाणी घालून व्यवस्थित उकळवून घ्या. त्यात १ मोठा चमचा साखर घाला आणि आंबटपणा येण्यासाठी लिंबाचा रस घाला. त्यात मीठ घालायला विसरू नका. हे पाणी २ मिनिटांसाठी उकळवून घ्या.

नसांमधलं घातक युरिक एसिड बाहेर निघेल; रोज १ तमालपत्र 'या' पद्धतीने खा-नसा होतील स्वच्छ

ढोकळा बनवण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवा. त्यात थोडं पाणी गरम करून झाकण ठेवून द्या. ढोकळ्याचं फुललेलं बॅटर चमच्याने ढवळून घ्या. एका छोट्या भांड्यात फॉईल पेपर ठेवून त्यावर ढोकळ्याचं मिश्रण घाला. ढोकळ्याचं बॅटर  भांड्यात घालण्याआधी त्यात लिंबू घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात प्लेट ठेवून ढोकळे वाफवून घ्या. तयार आहेत गरमागरम ढोकळे.  फोडणीसाठी गरम केलेलं पाणी त्यावर घाला. 

Web Title: No soda No lemon Make perfect dhokla in 3 minutes Easy recipe for soft-puffed dhokla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.