Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना काप ना वेफर्स, खा कच्च्या केळीचा ‘हा’ सुपरक्रंची कुरकुरीत मसालेदार पदार्थ, वाफाळत्या चहासोबत खा निवांत पोटभर

ना काप ना वेफर्स, खा कच्च्या केळीचा ‘हा’ सुपरक्रंची कुरकुरीत मसालेदार पदार्थ, वाफाळत्या चहासोबत खा निवांत पोटभर

No slices or wafers, eat this super crunchy spicy dish of raw bananas, eat it with steaming hot tea and enjoy : कच्या केळीचा असा पदार्थ नक्की करुन पाहा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 13:13 IST2025-12-18T13:13:02+5:302025-12-18T13:13:57+5:30

No slices or wafers, eat this super crunchy spicy dish of raw bananas, eat it with steaming hot tea and enjoy : कच्या केळीचा असा पदार्थ नक्की करुन पाहा. चवीला मस्त आणि करायला सोपा.

No slices or wafers, eat this super crunchy spicy dish of raw bananas, eat it with steaming hot tea and enjoy | ना काप ना वेफर्स, खा कच्च्या केळीचा ‘हा’ सुपरक्रंची कुरकुरीत मसालेदार पदार्थ, वाफाळत्या चहासोबत खा निवांत पोटभर

ना काप ना वेफर्स, खा कच्च्या केळीचा ‘हा’ सुपरक्रंची कुरकुरीत मसालेदार पदार्थ, वाफाळत्या चहासोबत खा निवांत पोटभर

कच्च्या केळीचे काप तसेच वेफर्स हे घरी सहज करता येणारे आणि चवीला खूपच मस्त लागणारे पदार्थ आहेत. बाजारात मिळणाऱ्या वेफर्सपेक्षा घरचे केळ्याचे काप अधिक ताजे, खुसखुशीत आणि आपल्याला हवे तसे चवीला तयार करता येतात, हीच त्यांची खासियत. कच्च्या केळीला नैसर्गिक चव आणि हलकी गोडसर चवही असते. (No slices or wafers, eat this super crunchy spicy dish of raw bananas, eat it with steaming hot tea and enjoy)त्याचे पातळ तुकडे करून केलेले काप किंवा वेफर्स तळले की ते कुरकुरीत होतात आणि खायला खूपच छान लागतात, सगळ्यांनाच आवडतात. चहाबरोबर, पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून किंवा डब्यात नेण्यासाठी हे काप उत्तम पर्याय ठरतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे वेफर्स आवडतात. पण कधी या पद्धतीने करुन पाहा. चवीला जास्त मस्त लागतात. तसेच करायला अगदी सोपे आहेत. पाहा काय करायचे. 

साहित्य 
कच्ची केळी, तेल, पाणी, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पूड 

कृती
१. कच्ची केळी एका पातेल्यात घ्यायची. त्यात थोडे मीठ घालायचे. पाणी घ्यायचे आणि त्यात केळी घालायची. केळी आधी स्वच्छ धुवायची. त्याची टोकं थोडी कापायची आणि चीक कमी करायचा. केळी व्यवस्थित शिजवून घ्यायची. गार करायची. गार झाल्यावर सालं सोलून घ्यायची. केळ्याचे लहान तुकडे करायचे, सुरीने चिरायचे. 

२. कढईत तेल गरम करत ठेवायचे. तेल छान तापल्यावर त्यात केळ्याचे तुकडे सोडायचे आणि तळून घ्यायचे. जरा तळले गेले की काढून घ्यायचे आणि गार करत ठेवायचे. गार झाल्यावर वाटीने किंवा सपाट भाग असलेल्या कोणत्याही भांड्याने केळ्याचे काप दाबायचे आणि जरा चपटे करायचे. चपटे केल्यावर पुन्हा एकदा तळायचे. लालसर खमंग आणि कुरकुरीत तळायचे. काढून घ्यायचे आणि गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर चांगलेच कुरकुरीत होतात. 

३. एका वाटीत चमचाभर आमचूर पूड घ्यायची. त्यात चमचाभर चाट मसाला घालायचा. तसेच थोडे लाल तिखटही घालायचे. मीठ घालायचे आणि मसाला एकजीव करायचा. मस्त मसाला तयार करायचा आणि तळलेल्या कापांवर घालायचा. सगळीकडे मसाला छान लागेल याची काळजी घ्यायची. मस्त कुरकुरीत होतात. नक्की खाऊन पाहा.  

Web Title : कुरकुरे मसालेदार कच्चे केले का नाश्ता: चाय के साथ उत्तम!

Web Summary : घर पर कुरकुरे, मसालेदार कच्चे केले के चिप्स बनाएं! केले को उबालें, काटें और तलें। मसालों के साथ सीजन करें। चाय के साथ इस कुरकुरे नाश्ते का आनंद लें।

Web Title : Crispy, spicy raw banana snack: Perfect with tea!

Web Summary : Make crispy, spicy raw banana chips at home! Boil, slice, and fry the bananas. Season with spices. Enjoy this crunchy snack with tea.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.