Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हन-कुकर नाही फ्रिजमध्ये करा चॉकलेट केक, फक्त ३ जिन्नस हवे-डाएट करतानाही खा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2026 11:19 IST

No oven no cooker, make chocolate cake in the fridge, only 3 ingredients needed - eat cake while dieting : केक करण्याची सोपी रेसिपी. करा काही मिनिटांत.

आजकाल अनेक जण गोड खायची इच्छा असूनही साखरेपासून दूर राहायचा प्रयत्न करतात. अशावेळी साखर न वापरता कमी गोड आणि चविष्ट केक हा उत्तम पर्याय ठरतो. या केकमध्ये नैसर्गिक गोडवा आणि हलकी चव असल्यामुळे तो आरोग्यदृष्ट्याही जास्त सुरक्षित मानला जातो. साखरेऐवजी केकला गोडवा देण्यासाठी पिकलेली केळी, खजूर, मनुका किंवा सफरचंदाचा गर वापरता येतो. या पदार्थांमधील नैसर्गिक साखर केकला पुरेसा गोडवा देते आणि चवही छान येते. त्यामुळे केक खाताना जडपणा जाणवत नाही. (No oven no cooker, make chocolate cake in the fridge, only 3 ingredients needed - eat cake while dieting)शिवाय या नैसर्गिक घटकांमुळे केक अधिक पौष्टिक होतो. अशा प्रकारचा केक ओव्हनशिवाय, फ्रिजचा वापर करुन करता येतो ही आणखी एक सोय आहे. फ्रिजमध्ये सेट होणारा केक बेक न करता तयार होतो. त्यामुळे गॅस, मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनची गरज लागत नाही.

अशीच एक सोपी आणि मस्त रेसिपी म्हणजे हा केळीचा केक. करायला अगदीच सोपा आहे. लहान मुलांना देण्यासाठी अगदी उत्तम आहे. त्याला आकार आणि रंगही फार मस्त येतो. त्यामुळे खायला हरकत नाही. 

साहित्य केळी, दूध, पाणी, कोको पावडर

कृती१. एका मिक्सरच्या भांड्यात सोललेली केळी घ्यायची. केळ्याचे तुकडे करुन घालायचे. त्यात गोड कोको पावडर घालायची, जर दोन केळी घेतली तर अर्धी वाटी कोको पावडर घ्यायची. त्यात दिड वाटी दूध घ्यायचे. मिक्सरमधून वाढून घ्यायचे. जरा घट्टसर करायचा. पातळ करायचा नाही. 

२. एका गोलाकार पातेल्याला पाणी लावायचे. जास्त नाही फक्त ते पातेलं ओलं करा. म्हणजे केक चिकटणार नाही. नंतर त्यात तयार केलेले मिश्रण ओता. सेट करुन घ्या. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. किमान १४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचे. रात्रीत छान सेट होतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Fridge Chocolate Cake: No Oven, 3 Ingredients, Diet-Friendly!

Web Summary : Make delicious, diet-friendly chocolate cake in the fridge using just bananas, cocoa powder, and milk. This no-bake recipe is perfect for those avoiding sugar and ovens. Simply blend, set in the fridge overnight, and enjoy a healthy, guilt-free treat!
टॅग्स :अन्नआहार योजनापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स