नवरात्रीच्या (Navratri 2025) दिवसांत बरेच लोक उपवास करतात. या काळात उपवास सोडताना लोक पूर्ण अन्न ग्रहण करत असले तरी कांदा, लसूण खाणं टाळतात. कांदा लसूण जेवणात वापरला नाही तर अन्न बेचव लागतं. असं अनेकांचं मत असतं. पण हे दोन्ही पदार्थ न वापरता तुम्ही ढाबास्टाईल मटार पनीरची भाजी घरच्याघरी करू शकता. गावरान चवीची मटार पनीरची भाजी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Matar Paneer Without Onion And Garlic)
भाजी चवदार, घट्ट होण्यासाठी कांदा लसणाव्यतिरिक्त काय वापरावे? (Matar Paneer Without Onion & Garlic)
ग्रेव्हीचा बेस तयार करण्यासाठी, पिकलेले लाल टोमॅटो गरम पाण्यात उकडून, त्यांची साल काढून प्युरी बनवा. ही प्युरी कांद्याच्या गोडव्याची आणि लसणाच्या तिखटपणाची उणीव काही प्रमाणात भरून काढते.
काजू आणि कलिंगडाच्या बिया गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून, त्याची बारीक पेस्ट करा.ही पेस्ट ग्रेव्हीला आणखी क्रिमि टेक्सचर देण्यासाठी ताजे दही किंवा फ्रेश क्रीमचा वापर करा.
कांदा-लसणाशिवाय मटार-पनीरची भाजी कशी करायची? (No Onion Garlic Matar Paneer Recipe)
पनीरचे क्यूब्स गरम पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवा. एका कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात पनीरचे क्यूब्स हलके तळून घ्या मटार फ्रोझन असल्यास ते गरम पाण्यात २ मिनिटे उकडून घ्या.
कढईत तूप किंवा तेल गरम करा.त्यात तेजपत्ता, वेलची, दालचिनी आणि हिंग टाकून तडतडू द्या.
आले पेस्ट टाकून १ मिनिट परतून घ्या. गॅस मंद करून, त्यात हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर घाला. मसाले जळू नयेत म्हणून लगेचच १ चमचा पाणी घाला आणि १ मिनिट परता.
केस महिनोंमहिने इंचभरही वाढत नाही? रवीना टंडन सांगतेय १ खास उपाय; लांबसडक होतील केस
आता कढईत टोमॅटो प्युरी घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. मीठ घाला आणि तेल सुटेपर्यंत प्युरीला झाकण ठेवून शिजू द्या. गॅस मंद करा आणि त्यात फेटलेले दही घाला. ग्रेव्ही फाटू नये म्हणून दही घातल्यावर मिश्रण सतत ढवळत रहा.
दही व्यवस्थित एकजीव झाल्यावर, त्यात काजू आणि कलिंगडाच्या बियांची पेस्ट घाला. मिश्रण पुन्हा ३-४ मिनिटं शिजू द्या. पेस्टमुळे ग्रेव्ही घट्ट होईल आणि तेल पुन्हा वेगळे होऊ लागेल.
कपभर वरीच्या तांदळाचा करा उपवासाचा ढोकळा; मऊसूत-जाळीदार ढोकळ्याची सोपी रेसिपी
ग्रेव्हीत मटार आणि गरजेनुसार गरम पाणी घाला. ग्रेव्हीला चांगली उकळ येऊ द्या. उकळ आल्यावर, तळलेले पनीर क्यूब्स घाला. वरून गरम मसाला आणि हातावर चुरून कसुरी मेथी घाला. २ मिनिटे झाकण ठेवून शिजवा. गरमागरम मटार-पनीरची भाजी तयार आहे.