उन्हाळ्यात वर्षभरासाठी म्हणून लागणारे गहू, तांदूळ आणि इतर कडधान्ये आपण मोठ्या उत्साहाने साठवून ठेवतो. मोठ्या प्रमाणावर धान्यांची अशी साठवणूक करताना आपण विशेष काळजी घेतो खरे...मात्र साठवणूक करताना एक मोठी समस्या कायम डोकेदुखी ठरते - उंदीर, कीड आणि बुरशी. हे घटक गहू-तांदळाच्या पोत्यांना कुरतडून मोठं नुकसान करतात, ज्यामुळे अन्नधान्य खराब होऊन आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. अनेक वेळा योग्य काळजी न घेतल्यामुळे हे त्रास वाढतात(natural ways to protect wheat from rats).
उंदराने पोती कुरतडल्यामुळे होणारे नुकसान केवळ आर्थिकच नसते, तर तेवढ्या अन्नाची नासाडी ही देखील मोठी चिंता असते. अशा पस्थितीत, नेमकं काय करावं सुचत नाही. यासाठी काळजी न करता, महागडी रासायनिक औषधे वापरण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातीलच काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण धान्याचे रक्षण करू शकता. साठवणुकीसाठी घरात ठेवलेली गहू - तांदुळाची किंवा इतर धान्यांच्या पोत्याला कीड - बुरशी लागू नये किंवा उंदराने कुरतडून नासधूस करु नये म्हणून स्वयंपाकघरातील ५ गोष्टी फायदेशीर ठरतील. स्वयंपाक घरातील केवळ पोत्यांजवळ ठेवल्याने उंदीर घराच्या वाटेलाही येणार नाहीत आणि तुमचे धान्य वर्षभर सुरक्षित, स्वच्छ व ताजे राहील. स्वयंपाकघरातील काहीपदार्थ (home remedies to keep rats away from stored grains) असे असतात जे केवळ पोत्यांजवळ ठेवल्याने उंदीर (how to keep rats away from rice & wheat storage) पोत्याजवळही येणार नाहीत आणि धान्य वर्षभर सुरक्षित, स्वच्छ व ताजे राहील.
गहू - तांदळाच्या पोत्यांजवळ ठेवा स्वयंपाक घरातील ५ पदार्थ...
१. पुदिना (Peppermint) :- कीड, बुरशी, उंदरांना पुदिन्याचा उग्र आणि तिखट वास अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्यांना दूर पळवण्यासाठी हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. तुम्ही गहू किंवा तांदळाच्या पोत्यांजवळ पुदिन्याची सुकी पाने व्यवस्थित पसरवून ठेवू शकता. यासोबतच आपण कापसाच्या बोळ्यावर पुदिना तेलाचे काही थेंब टाकून ते कापसाचे बोळे धान्य साठवण्याच्या जागेत ठेवावे.
२. तमालपत्र (Bay Leaf) :- अन्नधान्याला उंदरांपासून वाचवण्यासाठी तमालपत्र देखील खूप फायदेशीर ठरते. याच्या तीव्र वासामुळे उंदीर धान्यापासून लांब राहतात. गहू - तांदळाच्या किंवा इतर कडधान्यांच्या डब्यात किंवा पोत्यात ५ ते १० सुकी तमालपत्रे टाकून ठेवा. जिथे धान्य साठवले आहे त्या परिसरात तमालपत्रे ठेवल्याने उंदरांची ये - जा कमी होते आणि धान्य दीर्घकाळ सुरक्षित राहते.
३. कापूर (Camphor) :- उंदरांना पळवून लावण्यासाठी कापूर हा अत्यंत फायदेशीर उपाय मानला जातो. कापराचा तीव्र आणि उग्र वास उंदरांना सहन होत नाही, त्यामुळे ते लांब पळतात. गहू किंवा तांदूळ साठवलेल्या जागेत तुम्ही कापराचे छोटे तुकडे पसरवून ठेवू शकता. कापराचे तुकडे थेट धान्यात मिसळण्याऐवजी एखाद्या सुती कापडात किंवा छोट्या पोटलीत बांधून धान्याच्या पोत्यांजवळ ठेवावेत. यामुळे कापराचा वास हळूहळू सर्वत्र पसरतो आणि उंदीर तिथे येणे टाळतात.
मूग डाळ आणि रव्याचे कुरकुरीत पापड! कढईत टाकताच चौपट फुलतात - चवीला अप्रतिम आणि पौष्टिक...
४. लवंग आणि दालचिनी (Cloves and Cinnamon) :- उंदरांना धान्यापासून दूर ठेवण्याचा आणखी एक नैसर्गिक मार्ग म्हणजे लवंग आणि दालचिनीचा वापर. थोड्या लवंगा आणि दालचिनीचे तुकडे एका छोट्या सुती कापडात बांधून त्याची पोटली तयार करा. ही पोटली गहू-तांदळाच्या डब्यांजवळ, पोत्यांजवळ किंवा कोठाराच्या कोपऱ्यात ठेवा. याच्या तीव्र सुगंधामुळे उंदीर धान्याकडे फिरकत नाहीत.
Web Summary : Worried about pests ruining stored grains? Keep peppermint, bay leaves, camphor, cloves, and cinnamon near the bags. These natural ingredients effectively repel rats, insects, and mold, ensuring your grains stay fresh and protected all year round, preventing food wastage.
Web Summary : अनाज को कीड़ों से बचाने के लिए पुदीना, तेज पत्ता, कपूर, लौंग और दालचीनी को बोरियों के पास रखें। ये प्राकृतिक तत्व चूहों, कीड़ों और फफूंद को दूर रखते हैं, जिससे आपका अनाज पूरे साल ताजा और सुरक्षित रहता है और बर्बादी भी नहीं होती।