उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की प्रत्येक घराच्या गच्चीवर किंवा अंगणात एकच लगबग पाहायला मिळते, ती म्हणजे 'वाळवण'. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वर्षभराची साठवणूक करणं ही आपल्याकडे एक परंपराच आहे. बटाट्याचे वेफर्स, तांदळाच्या पळी पापड्या आपण नेहमीच करतो, पण यंदा काहीतरी वेगळं आणि पौष्टिक करून पाहायचं असेल, तर 'मुगाची डाळ आणि रव्याचे पळी पापड' हा एक उत्तम पर्याय आहे. मुगाची डाळ चवीला हलकी आणि पचायला उत्तम असते, तर रवा या पापडांना एक छान कुरकुरीतपणा आणि पांढराशुभ्र रंग देतो. हे पापड करायला अत्यंत सोपे, झटपट होणारे आणि चवीला अप्रतिम लागतात. विशेष म्हणजे, ज्यांना लाटण्याचे पापड करायचा कंटाळा येतो, त्यांच्यासाठी हे 'पळी पापड' म्हणजे एक वरदानच आहेत(Yellow Mug Daal & Suji Papad Recipe).
कुरकुरीत, हलके आणि खायला अतिशय टेस्टी असलेले हे पापड जेवणासोबत किंवा चहाच्या वेळेलाही अगदी परफेक्ट लागतात. शिवाय, घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून हे पापड तयार करता येतात. पिवळ्या मुगाच्या डाळीची खास चव आणि रव्याचा कुरकुरीतपणा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा साध्या जेवणाची चवही दुपटीने वाढते. पापड बनवायचे म्हटलं की पीठ मळणं, त्याचे गोळे करणं आणि तासंतास ते लाटत बसणं हे खूप मेहनतीचं काम वाटतं. पण जर, लाटण्याला स्पर्श न करता (Mug Daal Ani Ravyache Papad Recipe) तुम्ही अगदी १५ ते २० मिनिटांत ढीगभर पापड तयार करु शकता. हे पापड तेलात ( Mug Daal Rava Papad Recipe) टाकताच दुप्पट फुलतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. पाहा याची सहजसोपी - पारंपरिक रेसीपी....
साहित्य :-
१. मूग डाळ - २०० ग्रॅम (२ ते ३ तास भिजवा)२. रवा - २०० ग्रॅम (तासभर भिजत ठेवा)३. पाणी - गरजेनुसार ४. पापड खार - १/४ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून ७. खायचा रंग (पिवळा) - १ ते २ थेंब (पर्यायी)
कृती :-
१. सगळ्यांत आधी पिवळी मूग डाळ पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून ती पाण्यांत २ तास भिजवून घ्यावी. २. रवा देखील एका वेगळ्या भांड्यात तासभर पाण्यांत भिजवून घ्यावा. ३. आता पाण्यांत भिजलेली मूग डाळ मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावी. एका बाऊलमध्ये काढून १० मिनिटे झाकून ठेवावी.
रोज रात्री दुधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, सुटलेलं पोट होऊ लागेल सपाट-सोपा उपाय....
४. पाण्यांत भिजलेल्या रव्या वरील जास्तीचे पाणी काढून तो रवा मूग डाळीच्या वाटून घेलेल्या तयार पेस्टमध्ये घालावा. ५. एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात पापड खार, चवीनूसार मीठ, चिलीफ्लेक्स घालावेत. सगळ्यात शेवटी यात मूग डाळ, रव्याचे मिश्रण ओतावे आणि गरजेनुसार थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मध्यम कंन्सिस्टंसीचे तयार करून घ्यावे. ६. ५ ते १० मिनिटे मिश्रण चमच्याने हलवून हलवून व्यवस्थित शिजवून घ्यावे. ७. मिश्रण व्यवस्थित शिजून झाल्यावर प्लास्टिक किंवा स्वच्छ सुती कापडावर तयार मिश्रणाचे पळीच्या मदतीने गोलाकार असे पापड घालावेत. ८. कडक उन्हांत पापड ३ ते ४ दिवस किंवा नीट संपूर्णपणे वाळेपर्यंत सुकू द्यावेत.
पिवळी मूग डाळ आणि रव्याचे वर्षभर टिकतील असे कुरकुरीत, खुसखुशीत पळी पापड खाण्यासाठी तयार आहेत. आपण आपल्या आवडीनुसार हे पापड तेलात तळून कधीही खाऊ शकता.
Web Summary : Make crispy Moong Dal and Rava Papad easily this summer. This traditional recipe uses simple ingredients and requires no rolling. The papads puff up when fried and are perfect with meals or tea. Enjoy this tasty and nutritious snack!
Web Summary : इस गर्मी में आसानी से बनाएं कुरकुरे मूंग दाल और रवा पापड़। यह पारंपरिक रेसिपी सरल सामग्री का उपयोग करती है और इसमें बेलन की आवश्यकता नहीं होती है। तलने पर पापड़ फूल जाते हैं और भोजन या चाय के साथ एकदम सही लगते हैं। इस स्वादिष्ट और पौष्टिक नाश्ते का आनंद लें!