Join us
Daily Top 2Weekly Top 5

कसंतरीच दिसतं म्हणत नाक मुरडू नका, सुरणाची भाजी म्हणजे भरपूर मॅग्नेशियम, ‘अशी’ पारंपरिक पद्धत-खाजेचं टेंशन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 16:12 IST

Must eat yam , this vegetable is rich in magnesium, try making it this way you will love it : सुरणाची भाजी आहारात असायलाच हवी. पोषण असते भरपूर.

सुरण ही आपल्या पारंपरिक स्वयंपाकात वापरली जाणारी पण आजकाल थोडी दुर्लक्षित झालेली भाजी आहे. योग्य पद्धतीने स्वच्छ करुन आणि शिजवून खाल्ल्यास सुरण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पचायला जड वाटणारी ही भाजी योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्ली तर शरीराला अनेक प्रकारे पोषण देते. सुरणामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. (Must eat yam , this vegetable is rich in magnesium, try making it this way you will love it )त्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही सुरण उपयुक्त ठरते. यामधील कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात, तर लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे शरीराची ताकद वाढवण्यास मदत करतात. सुरणात असणारे अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराची सूज कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. काही लोकांमध्ये मूळव्याध, पाइल्ससारखी समस्या सुरणाच्या नियमित आणि मर्यादित सेवनामुळे कमी होण्यास मदत होते. 

सुरणाचे विविध प्रकार भारतीय स्वयंपाकात केले जातात. काही ठिकाणी मोठ्या आकाराचे सुरण मिळते, तर काही ठिकाणी छोट्या आकाराचे सुरण मिळते. महाराष्ट्रात प्रामुख्याने करड्या रंगाचे सुरण वापरले जाते. दक्षिण भारतात सुरणाला सेनी किळंगु किंवा याम म्हणतात आणि तो मसालेदार किंवा चिंच-गूळ घालून तयार केला जातो. काही प्रकारचे सुरण कमी खाजेरी असतात, तर काही प्रकार शिजवताना किंवा कापताना जास्त खाज देणारे असतात. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते. सुरणाला चिंचेच्या पाण्यात उकळायचे म्हणजे त्याची खाज लागत नाही. 

आहारात सुरणाचा समावेश विविध प्रकारे करता येतो. सुरणाची साधी भाजी, फोडणी आणि थोडी गोड-आंबट अशी तयार केली तर ती चवीला खूप छान लागते. उपवासाच्या दिवशी शेंगदाण्याचे कुट घालून सुरणाची भाजी केली जाते. काही घरांमध्ये सुरणाचे काप तळून किंवा परतून खाल्ले जातात. तर काही ठिकाणी सुरणाची उसळ, आमटी किंवा भाजीत डाळ घालूनही सुरण करतात. दक्षिणेकडील पदार्थांमध्ये सुरण सांबार, कढी किंवा मसाला भाजीमध्ये वापरतात.

सुरण खाताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कापताना हाताला तेल लावणे किंवा चिंचेचा कोळ वापरणे खाज कमी करण्यास मदत करते. सुरण नेहमी पूर्णपणे शिजवूनच खावा, कच्चा किंवा अर्धकच्चा सुरण पचनास त्रासदायक ठरु शकते. लहान मुले, गर्भवती महिला किंवा पचनाचे गंभीर त्रास असलेल्यांनी सुरण मर्यादित प्रमाणातच खावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Dislike Yam: Magnesium-Rich Vegetable with Traditional Cooking for Health

Web Summary : Yam, a fiber-rich vegetable, aids digestion, controls weight, and boosts energy. Rich in minerals and antioxidants, it reduces inflammation and strengthens immunity. Cook it properly to avoid itching and enjoy various recipes like stir-fries and curries. Consume in moderation, especially for children and pregnant women.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीआहार योजना