Join us
Daily Top 2Weekly Top 5

Holi Celebration 2026: रंग खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा खमंग कुरकुरीत मुगडाळ वडे, घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 14:02 IST

Moong Dal Pakoda Recipe: होळी खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुरकुरीत आणि पौष्टिक मुगाच्या डाळीच्या वड्यांचा बेत करू शकता...(how to make moong dal pakoda?) 

ठळक मुद्दे मुगडाळीचे वडे करण्यासाठी खूप काही वेगळी तयारी करण्याची गरजही नसते...

प्रत्येक सणाचा आनंद जसा उत्साहात घेतला जातो, तसाच आनंद होळीचाही साजरा केला जातो. यानिमित्ताने मित्रमंडळी, सोसायटीमधले लोकं, नातलग असे सगळे एखाद्याच्या घरी एकत्र येतात आणि मग तिथे जल्लोषात रंग खेळला जातो. रंग खेळताना किंवा खेळल्यानंतर थोडीफार भूक लागतेच. आता अशावेळी जर तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही खास नाश्त्याचे पदार्थ करायचे असतील तर त्यासाठी मुगडाळीचे वडे हा एक उत्तम पर्याय आहे (moong dal pakoda recipe). मुगडाळीचे वडे तुम्ही अगदी झटपट करू शकता (how to make moong dal pakoda?). शिवाय ते करण्यासाठी खूप काही वेगळी तयारी करण्याची गरजही नसते...(easy recipe of moong dal pakoda)

मुगडाळीचे वडे करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ वाट्या हिरवी मुगाची डाळ

५ ते ६ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या

रंग खेळताना ४ गोष्टींची काळजी घ्या, कितीही रंगलात तरी अंगावरचा रंग चटकन निघून जाईल 

१ ते दिड इंच आलं आणि धनेपूड, जिरेपूड प्रत्येकी एकेक टीस्पून

२ मध्यम आकाराचे कांदे, एका लिंबाचा रस

१ वाटी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ

 

कृती 

मुगाच्या डाळीचे वडे करण्यासाठी मुगाची डाळ २ ते ३ वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्या आणि मग ४ ते ५ तास ती पाण्यात भिजत ठेवा.

यानंतर भिजलेल्या डाळीमधलं जास्तीचं पाणी काढून टाका. भिजलेली डाळ थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं घाला आणि अगदी बारीक वाटण करून घ्या.

पोलादासारखी मजबूत होतील हाडं- ५ पदार्थ खा, गुडघ्यांची कुरकुर, पाठदुखी कायमची थांबेल

मुगाची डाळ मिक्सरमधून वाटत असताना त्यात जास्त पाणी घालू नका. कारण वड्यांचं पीठ घट्ट असावं. शिवाय पीठ जास्त पातळ झालं तर वडेही सैलसर होतात आणि तेलही जास्त लागतं. आता बारीक झालेल्या पिठामध्ये जिरेपूड, धनेपूड, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घाला आणि याचे मस्त वडे तळून घ्या. पीठ घट्ट असल्याने तुम्ही हाताने वडे तोडण्याऐवजी चमच्यानेही अगदी अलगदपणे वडे करू शकता. गरज वाटल्यास त्यात बेकिंग सोडा घाला. वडे खूप खुसखुशीत, खमंग होतील. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Holi 2026: Make crispy Moong Dal Vada for guests; easy recipe.

Web Summary : Celebrate Holi with delicious Moong Dal Vadas! This quick and easy recipe requires minimal preparation. Simply soak, grind with spices, and fry for a tasty snack your guests will love. Enjoy the festive flavors!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहोळी 2026