lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी

भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी

Mix Veg Karanji Recipe: सध्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळत आहे. म्हणूनच सुटीच्या दिवशी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी हा मिक्स व्हेज करंजीचा मेन्यू करून पाहा... (perfect breakfast menu, Healthy menu for tiffin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 04:31 PM2024-01-23T16:31:36+5:302024-01-23T16:35:10+5:30

Mix Veg Karanji Recipe: सध्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळत आहे. म्हणूनच सुटीच्या दिवशी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी हा मिक्स व्हेज करंजीचा मेन्यू करून पाहा... (perfect breakfast menu, Healthy menu for tiffin)

Mix veg karanji recipe in Marathi, How to make spicy karanji using vegetables? Mix veg gujjiya recipe, perfect breakfast menu, Healthy menu for tiffin | भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी

भरपूर भाज्या घालून केलेली मिक्स व्हेज करंजी, खमंग- खुसखुशीत, सगळेच आवडीने खातील- घ्या रेसिपी

Highlightsनाश्त्यासाठी, सायंकाळी काहीतरी हेल्दी स्नॅक्स म्हणून किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे.

वेगवेगळ्या चवीच्या, रंगाच्या भाज्यांची खरी मजा असते ती हिवाळ्यात. या दिवसांत भाज्या अगदी ताज्या आणि चवदार असतात. शिवाय स्वस्त मिळतात. त्यामुळे ज्या दिवशी भरपूर भाज्या आणाल त्या दिवशी घरी मिक्स व्हेज करंजीचा (Mix veg gujjiya recipe) हा बेत करून पाहा. नाश्त्यासाठी, सायंकाळी काहीतरी हेल्दी स्नॅक्स म्हणून किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे (Mix veg karanji recipe in Marathi). चवदार, खुसखुशीत आणि अतिशय पौष्टिक...(perfect breakfast menu, Healthy menu for tiffin))

मिक्स व्हेज करंजी रेसिपी

 

साहित्य

१ वाटी रवा

अर्धी वाटी कणिक

गाजर, मटार, पत्ताकोबी, बीट, सिमला मिरची, कांदा

फक्त १० मिनिटांत चेहऱ्यावर येईल गोल्डन गो, घरच्याघरी ब्लीच करण्याची बघा सोपी पद्धत

आलं- लसूण पेस्ट १ टीस्पून

२ हिरव्या मिरच्या

१ टेबलस्पून कोथिंबीर

अर्धा टेबलस्पून कसूरी मेथी

धने- जीरे पूड प्रत्येकी १- १ टीस्पून

मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ

गरम मसाला चवीनुसार

चाट मसाला अर्धा टिस्पून

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

ओवा १ टीस्पून

अर्ध्या लिंबाचा रस

 

कृती

सगळ्यात आधी रवा आणि कणिक एकत्र करून घ्या. त्यात ओवा थोडं मीठ आणि कडक तापवून घेतलेलं थोडं तेल म्हणजेच मोहन टाका आणि हे पीठ पाणी टाकून घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी ते झाकून ठेवा.

लेदर सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय, सोफा होईल चकाचक आणि सुगंधित

गाजर, बीट किसून घ्या. कांदा, सिमला मिरची आणि पत्ताकोबी अगदी बारीक चिरून घ्या. या सगळ्या भाज्या सम प्रमाणात घ्याव्या.

मटार मिक्सरमधून थोडे जाडे- भरडे फिरवून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नये.

यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यात जिरे- हिंग टाकून फोडणी करून घ्या. यानंतर थोडी हळद टाका आणि आलं- लसणू आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या. यानंतर कांदासोडून इतर सगळ्या भाज्या आणि मटार टाका.

 

त्यामध्ये मीठ, गरम मसाला, चाट मसाला, धने- जिरेपूड, पाहिजे असल्यास लाल तिखट, कोथिंबीर, कसूरी मेथी असं सगळं घालून लिंबाचा रस पिळा आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. झाकण ठेवून अगदी एखादा मिनिट ते वाफवून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि आता त्या मिश्रणात बारीक चिरलेला कच्चा कांदा टाका. आता हे झालं आपलं करंजीचं सारण तयार.

स्वयंपाक घरातला सौंदर्याचा खजिना- बघा 'या' ६ पदार्थांची कमाल, फेशियल- क्लिनअपची गरजच नाही

करंजी लाटण्यासाठी जे पीठ भिजवलं आहे त्याची पुरी लाटा. त्याच्या मधोमध सारण भरा. पुरीच्या कडांना थोडं पाण्याचं बोट लावा आणि आता ती टाेकं जोडून घ्या. कडांना पाणी लावल्याने करंजी तळताना फुटत नाही. 

या करंज्या आता तेलात मध्यम आचेवर छान खमंग तळून घ्या...

गरमागरम करंजी तुम्ही टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, लोणचं, दही यासोबत खाऊ शकता किंवा मग नुसती खाल्ली तरी देखील अतिशय चवदार लागते. 


 

Web Title: Mix veg karanji recipe in Marathi, How to make spicy karanji using vegetables? Mix veg gujjiya recipe, perfect breakfast menu, Healthy menu for tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.