Lokmat Sakhi >Food > ''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

Masala Paratha Recipe: पोळ्या किंवा चपात्या खायला दिल्यानंतर नाक मुरडणारी मुलं या थोड्या वेगळ्या स्टाईलने केलेल्या पाेळ्या मात्र आवडीने फस्त करतील..(best option for kids tiffin) या पोळ्यांना आपण मसाला पराठा असंही म्हणू शकतो.(easy and simple breakfast menu)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 13:56 IST2025-06-10T13:56:13+5:302025-06-10T13:56:55+5:30

Masala Paratha Recipe: पोळ्या किंवा चपात्या खायला दिल्यानंतर नाक मुरडणारी मुलं या थोड्या वेगळ्या स्टाईलने केलेल्या पाेळ्या मात्र आवडीने फस्त करतील..(best option for kids tiffin) या पोळ्यांना आपण मसाला पराठा असंही म्हणू शकतो.(easy and simple breakfast menu)

masala paratha recipe, best option for kids tiffin, easy and simple breakfast menu   | ''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

Highlightsमसाला पराठा हा पदार्थ नाश्त्यासाठी तसेच मुलांना डब्यात देण्यासाठीही खूप चांगला, सोपा आणि झटपट होणारा आहे.

लहान मुलांना नेहमीच काहीतरी वेगळं खायला हवं असतं. कधी कधी तर मुलांना खूप भूक लागलेली असते. पण तरीही त्यांना जर त्यांच्या आवडीची भाजी दिसली नाही तर ते सरळ भूक नाही म्हणून सांगतात आणि उपाशी राहतात. पोळी- भाजी खाण्याचा त्यांना खूप कंटाळा येतो. पोळी भाजी नको, काहीतरी वेगळं हवं अशी त्यांची सततची मागणी असते. शाळेच्या डब्यातही पोळी भाजी नेणं त्यांना आवडत नाही. अशावेळी मुलांना काहीतरी पौष्टिक खाऊ घालायचं असेल तर पोळ्याच करा पण त्या थोड्या वेगळ्या स्टाईलने करा.. अगदी आवडीने मुलं पोटभर खातील (masala paratha recipe). मसाला पराठा हा पदार्थ नाश्त्यासाठी तसेच मुलांना डब्यात देण्यासाठीही खूप चांगला (best option for kids tiffin), सोपा आणि झटपट होणारा आहे.(easy and simple breakfast menu)

मसाला पराठा करण्याची  रेसिपी 

 

साहित्य

कणिक

१ टीस्पून लाल तिखट

१ टीस्पून पावभाजी मसाला

चमचाभर तूप

केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

चिमूटभर मीठ

१ टीस्पून चाट मसाला

बारीक चिरलेली कोथिंबीर

थोडेसे पांढरे तीळ आणि बारीक चिरलेला लसूण

 

कृती

सगळ्यात आधी पोळ्या करण्यासाठी जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्या.

त्यानंतर कणकेचा एक गोळा घ्या आणि त्याची पोळी लाटून घ्या. पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर तूप घाला. त्या तुपावरच थोडं मीठ, चाट मसाला, लाल तिखट, पावभाजी मसाला घाला. आता या पोळीचा रोल करा आणि त्यानंतर तो गोलाकार वळवून घ्या.

एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..

आता हा रोल मधोमध कापून घ्या. आता त्यावर थोडं पीठ, तीळ, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला लसूण घाला आणि ते पुन्हा लाटून घ्या. आता हा पराठा तव्यावर खमंग भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर तूप लावून सर्व्ह करा. खूप खमंग आणि चवदार लागेल. एकदा खाऊन पाहा. 


Web Title: masala paratha recipe, best option for kids tiffin, easy and simple breakfast menu  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.