Lokmat Sakhi >Beauty > केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

Natural Hair Dye For Gray Hair: पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याच्या टरफलांचा खूप चांगला उपयोग करता येतो. तो कसा करायचा ते पाहूया..(how to get rid of white hair?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 18:32 IST2025-06-09T18:32:05+5:302025-06-09T18:32:47+5:30

Natural Hair Dye For Gray Hair: पांढरे केस काळे करण्यासाठी कांद्याच्या टरफलांचा खूप चांगला उपयोग करता येतो. तो कसा करायचा ते पाहूया..(how to get rid of white hair?)

natural hair dye for gray hair, how to get rid of white hair, simple tips and tricks to get rid of gray hair  | केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

Highlightsयामुळे तुमचे केस पांढरे होणं तर थांबेलच शिवाय केसांची चांगली वाढही होईल.

हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कित्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे केस पांढरे झालेले दिसतात. शाळकरी मुलांच्या केसांमध्येही मधूनच रुपेरी केस चमकताना दिसतात. कमी वयात केस पांढरे होणं अर्थातच कोणाला आवडणारं नसतं. त्यामुळे मग पांढरे केस लपविण्यासाठी तरुण मुलांची धडपड सुरू होते. त्यासाठी एवढ्या कमी वयापासूनच विकतचे हेअरडाय लावणं नकोसं वाटतं. कारण त्यात खूप जास्त केमिकल्स असतात. शिवाय मेहेंदी लावणंही खूप किचकट आणि वेळखाऊ काम. म्हणूनच आता ना मेहेंदी लावायची ना केमिकल्स असणारे हेअर कलर वापरायचे (how to get rid of white hair?).. हा एक सोपा घरगुती उपाय करा (simple tips and tricks to get rid of gray hair). यामुळे तुमचे केस पांढरे होणं तर थांबेलच शिवाय केसांची चांगली वाढही होईल.(natural hair dye for gray hair)

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून काय उपाय करावा?

केस पांढरे होऊ नयेत म्हणून कांद्याची टरफलं आणि चहा पावडर हे दोन पदार्थ एकत्र करून केसांना लावणं खूप जास्त फायदेशीर ठरतं. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ masalakitchenbypoonam या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगलं? ५ सेकंदाचा उपाय- १ मिनिटात वाटेल फ्रेश, ॲसिडीटीही कमी होईल 

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एका भांड्यामध्ये २ कप पाणी घ्या. त्यामध्ये २ ते ३ कांद्यांची टरफलं आणि दिड ते दोन चमचे चहा पावडर घाला.

आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याचा रंग जेव्हा गर्द चॉकलेटी होईल तेव्हा गॅस बंद करा. आता हे पाणी थंड होऊ द्या आणि त्यानंतर गाळून ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

 

आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपण्यापुर्वी हे पाणी केसांच्या मुळांशी लावा आणि हलक्या हाताने डोक्याला मालिश करा. दुसऱ्यादिवशी सकाळी एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. हा उपाय नियमितपणे केल्यास केस काळेच राहतील, पांढरे होणार नाहीत असं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

शिवाय ज्यांच्या केसांना वाढ नसते, त्यांच्यासाठीही हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. कारण कांद्यामधले काही घटक केसांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. कांद्याच्या रसामुळे केस गळण्याचे प्रमाणही बरेच कमी होते. 


 

Web Title: natural hair dye for gray hair, how to get rid of white hair, simple tips and tricks to get rid of gray hair 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.