कधी कधी असं होतं की नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळं करून खावं वाटतं, पण ते वेगळं काहीतरी करण्यासाठी एकतर वेळही नसतो आणि दुसरं म्हणजे बराच वेळ किचनमध्ये घालवून वेगळा पदार्थ करण्याचा कंटाळाही आलेला असतो. अशी अवस्था जर तुमची कधी झाली तर अशावेळी मसाला दही ही अतिशय चवदार आणि खूप झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. मसाला दही करण्यासाठी खूप आधीपासून तयारी करण्याची गरज नाही (how to make masala dahi?). शिवाय ती अगदी चटकन होते त्यामुळे किचनमध्ये तासनतास उभंही राहावं लागत नाही.(Masala Dahi Recipe in Just 5 Minutes)
मसाला दही करण्याची रेसिपी
२ ते ३ लसूण पाकळ्या
१ लहान आकाराचा कांदा
२ ते ३ सुकलेल्या लाल मिरच्या
तुम्हीही आलं- लसूण एकत्र वाटून पदार्थांमध्ये घालता? 'ही' चूक केल्याने काय नुकसान होतं ते वाचाच..
१ टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
कडिपत्त्याची ७ ते ८ पानं
१ ते दिड वाटी दही आणि चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये तेल घाला.
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, सुकलेल्या लाल मिरच्या, कडिपत्ता आणि चिमूटभर हिंग तसेच जिरे घाला.
किचनमधला कचरा आणि चमचाभर गूळ.. रोपांसाठी उत्कृष्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत, फुलं येतील भरपूर..
सगळे पदार्थ तेलामध्ये मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या. लसूण आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतावे. यानंतर गॅस बंद करा. परतून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या.
एका पसरट भांड्यात दही घ्या आणि ते चांगलं फेटून घ्या. त्यामध्ये तयार केलेला मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. चटकदार मसाला दही तयार. पोळीसोबत हे दही कधीतरी खाऊन पाहा. चव एवढी आवडेल की वारंवार करून खाल.
