lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

Makhandi Halwa Recipe: मखंडी हलवा हा पाकिस्तानमधल्या पेशावर भागातला प्रसिद्ध पदार्थ आहे. एकदा चाखून पाहायलाच हवा असा... (famous recipe from Peshawar, Pakistan)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 04:28 PM2024-01-31T16:28:01+5:302024-01-31T16:28:39+5:30

Makhandi Halwa Recipe: मखंडी हलवा हा पाकिस्तानमधल्या पेशावर भागातला प्रसिद्ध पदार्थ आहे. एकदा चाखून पाहायलाच हवा असा... (famous recipe from Peshawar, Pakistan)

Makhandi halwa recipe, famous recipe from Peshawar Pakistan, How to make Pakistani makhandi halwa, Sweetdish from Pakistan | मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

Highlightsबघा हा प्रसिद्ध हलवा आपल्या घरीच कसा तयार करायचा...

बहुतांश भारतीय लोकांना गोड खायला आवडतंच. आता तब्येतीबाबत बहुसंख्य लोक अधिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे गोड खाणं अनेक जणांनी कमी केलं असलं तरी थोडंसं गोड कधीतरी हमखास लागतंच. म्हणूनच गोड खाण्याची इच्छा झाली किंवा घरी कधी पाहूणे येणार असतील आणि तुम्हाला त्यांच्यासाठी एखादी वेगळी रेसिपी करायची असेल तर अशावेळी हा मखंडी हलवा करून पाहा. मखंडी किंवा माखंडी अशा दोन्ही नावांनी ओळखला जाणारा हा गोड पदार्थ मुळचा पाकिस्तानातल्या पेशावरचा आहे (How to make Pakistani makhandi halwa). त्या भागात फिरायला जाणारे पर्यटक अगदी आवर्जून या हलव्याची गोडी चाखतात (famous recipe from Peshawar Pakistan). म्हणूनच बघा हा प्रसिद्ध हलवा आपल्या घरीच कसा तयार करायचा....(Makhandi halwa recipe)

मखंडी हलवा रेसिपी

 

साहित्य

१ वाटी तूप

१ वाटी रवा

बघा मन्नारा चोप्राचे सुपर स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स

अर्धी वाटी साखर

अर्धी वाटी पाणी

१ टीस्पून वेलचीपूड

१ टेबलस्पून बदामाचे तुकडे

१ टेबलस्पून पिस्त्याचे तुकडे 

 

कृती

सगळ्यात आधी रवा पाण्यात भिजवून घ्या. साधारण ४० ते ५० मिनिटे रवा पाण्यात भिजू द्या.

यानंतर कढई गरम करायला ठेवा. त्यात तूप आणि साखर घाला. साखरेचा पाक होईपर्यंत हे मिश्रण हलवत राहा.

लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्रांचे ६ फॅशनेबल डिझाईन्स

साखरेचा पाक झाल्यावर त्यात पाणी, वेलची पूड आणि सुकामेव्याचे तुकडे घाला आणि सगळं मिश्रण हलवून घ्या.

या पाण्याला उकळी येण्यास सुरुवात झाली की त्यात भिजवलेला रवा घाला आणि सगळं मिश्रण हलवत राहा.

यानंतर जेव्हा पाणी आटेल आणि रवा कढईला चिटकून न बसता कढईपासून वेगळा हाेऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करा. 

यानंतर वरतून थोडा आणखी सुकामेवा टाकून छान सजवून घ्या आणि गरमागरम मखंडी हलवा डिशमध्ये घालून सर्व्ह करा..

 

Web Title: Makhandi halwa recipe, famous recipe from Peshawar Pakistan, How to make Pakistani makhandi halwa, Sweetdish from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.