जिरे आणि आमसुलाची कढी ही पारंपरिक चवीसोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जाते. साधी, हलकी आणि पचायला सोपी अशी ही कढी विशेषतः उन्हाळ्यात शरीराला आराम देणारी ठरते. आपल्या आहारात याचा समावेश केल्यास अनेक लहानसहान त्रासांपासून नैसर्गिकरित्या दिलासा मिळू शकतो. जिऱ्याचे गुणधर्म पाहिले तर ते पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. जिरे पोटातील वायू, अपचन, गॅस यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच जिरे शरीरातील पचनक्रिया सुधारते आणि अन्न नीट पचण्यास सहाय्य करते.
दुसरीकडे आमसुल हे शरीराला थंडावा देणारे आणि पित्त शांत करणारे. उन्हाळ्यात वाढणारी उष्णता, अॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आमसुल उपयुक्त ठरते. यामध्ये नैसर्गिक आम्लता असली तरी ती शरीराला त्रासदायक नसून उलट पचन सुधारण्यास मदत करते. तसेच आमसूलामुळे तोंडाला चव येते आणि भूक वाढण्यास मदत होते. (Make traditional cumin and amsula kadhi in 5 minutes, summer recipes - cools the stomach)एकूणच, जिरे आणि आमसुलाची कढी ही फक्त चविष्ट नाही तर शरीराला पोषण देणारी, पचन सुधारवणारी आणि उष्णतेपासून संरक्षण देणारी एक छान रेसिपी आहे. रोजच्या आहारात समावेश केल्यास तिचे आरोग्यदायी फायदे निश्चितच अनुभवता येतात. अगदी सोपी रेसिपी आहे.
साहित्य आमसुल, जिरे, तेल, पाणी, कोथिंबीर, मीठ
कृती१. आमसुल पाण्यात भिजत ठेवायचे, थोडावेळ भिजवले की नंतर हाताने कुस्करुन घ्यायचे. कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. मस्त बारीक चिरायची.
२. एका कढईत तेल घ्यायचे. अगदी थोडे तेल घ्यायचे. त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे. जिरं मस्त फुलल्यावर त्यात आमसुल घालायचे. आमसुलाचे पाणी थोडेच असते. ते उकळल्यावर लगेच वरतून पाणी ओतायचे.
३. पाणी छान उकळू द्यायचे. त्याचा रंग लाल होतो मग त्यात चवीनुसार मीठ घालायचे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त उकळायचे आणि गरमागरम प्यायचे.
Web Summary : Cumin-Amsul Kadhi, a traditional drink, aids digestion and cools the body. Cumin relieves gas and improves digestion, while Amsul reduces heat and acidity. This tasty, nutritious recipe protects from summer heat and promotes overall well-being. Quick to make with basic ingredients.
Web Summary : जीरा-अमसुला कढ़ी पाचन में सहायक और शरीर को ठंडा करती है। जीरा गैस से राहत देता है और पाचन क्रिया को बेहतर बनाता है, जबकि अमसुला गर्मी और एसिडिटी को कम करता है। यह स्वादिष्ट और पौष्टिक रेसिपी गर्मी से बचाती है और स्वास्थ्य को बढ़ावा देती है। झटपट बनाएं।