Join us

आत्ताच अशी सुंठ गोळी करा घरी, पावसाळ्यातला सर्दीखोकला छळणारच नाही! पावसात भिजण्यापूर्वी खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 08:40 IST

Make this herbal candy at home right now, cold or cough won't bother you during the monsoon! Eat it daily : पावसाळ्यासाठी खास रेसिपी. औषधासारखे काम करेल ही गोड तिखट गोळी. पाहा कशी करायची.

पावसाळा सुरू झाला की सर्वत्र हिरवळ पसरते. आकाश अगदी सुंदर दिसायला लागते.  सगळेच छान वाटायला लागते. पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते. (Make this herbal candy at home right now, cold or cough won't bother you during the monsoon! Eat it daily )पावसात भिजणे म्हणजे सुख. पण पावसात भिजल्याने आजारपणही येते. पावसाळा आला की वातावरण जेवढे सुंदर होते, तेवढेच गढूळही होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इतर काही आजार वाऱ्यासारखे पसरतात. त्यामुळे घरात ही साधी सुंठ गोळी आत्ताच करुन ठेवा. रोज दोन गोळ्या खा म्हणजे सर्दी खोकला होणारच नाही.  

सुंठ गोळी अँण्टी बॅक्टेरियल असते. घशासाठी फारच चांगली असते. कोणते संसर्ग होत नाहीत तसेच घसा खवखवत नाही. खोकला होत नाही. (Make this herbal candy at home right now, cold or cough won't bother you during the monsoon! Eat it daily )रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आजारांपासून संरक्षण मिळते. पचनासाठी अगदीच छान असते. पोट साफ करते तसेच इतरही पोटाचे काही त्रास असतील तर ते ही कमी होतात. मुख्य म्हणजे अगदी कमी सामग्रीत करता येते आणि अगदी झटपट होते. लहान मुलांनाही चव आवडते. करायला अगदीच सोपी असते. 

साहित्यसुंठ पूड, गूळ, हळद, तूप  

कृती१. सुंठ पूड विकत आणा किंवा घरीच तयार करा. सुंठ बारीक कुटून घ्यायची. सुंठ पूड विकत आणणे जास्त सोयीस्कर ठरेल. ती अगदी बारीक असते. 

२. गूळ छान बारीक चिरुन घ्यायचा. एका पातेल्यात थोडे तूप घ्यायचे. दोन चमचे तूप खुप झाले. तुपावर किसलेला गूळ घालायचा. गूळ छान पातळ करायचा. सतत ढवळायचा. गॅस अगदी मंद ठेवायचा. गूळ करपू देऊ नका. गूळ छान विरघळल्यावर त्यात सुंठ पूड घालायची. अर्धी वाटी गूळ घेतला असेल तर तीन ते चार चमचे सुंठ पूड घ्यायची. त्यात चमचाभर हळद घालायची. 

३. सगळं छान एकजीव करायचे. ढवळत राहायचे. थोडे तूप सुटले की मिश्रण जरा घट्ट होईल. मग गॅस बंद करायचा. मिश्रण गार करत ठेवायचे. सगळं छान गार झाल्यावर हाताला तूप लावायचे आणि गोळ्या वळून घ्यायच्या. गोळ्या वळून झाल्यावर थोडावेळ उन्हात वाळवा किंवा पंख्याखाली वाळवा. मग हवाबंद डब्यात साठवून ठेवा.      

टॅग्स :अन्नपाऊसकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकिचन टिप्स