Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालकाची कोशिंबीर करा फक्त १० मिनिटांत, पौष्टिक आणि डाएटफ्रेंडली पारंपरिक चविष्ट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 13:30 IST

Make spinach salad in just 10 minutes, a nutritious and diet-friendly traditional delicacy : पालक आणि दह्याची अशी कोशिंबीर नक्की करा.

लहान मुलेच काय मोठी माणसेही पाले भाज्या खाताना नाक मुरडतात. मात्र एक पालेभाजी अशी आहे जी आवडीने खाल्ली जाते ती म्हणजे पालक.  पालक ही पालेभाजी विविध प्रकारे आहारात घेता येते. पालक पनीर तर लोकांच्या अगदी आवडीचा पदार्थ. (Make spinach salad in just 10 minutes, a nutritious and diet-friendly traditional delicacy)पालक पराठेही करता येतात. त्याच प्रकारे आणखी एक मस्त रेसिपी आहे ती म्हणजे पालकाची कोशिंबीर. दहा मिनिटांत होते आणि चवीला जबरदस्त लागते. भाकरी, पोळी किंवा भात सगळ्यासोबत खाऊन शकता. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा.   

साहित्य पालक, दही, कांदा, तेल, लसूण, लाल मिरची, जिरे, हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर

कृती१. पालक स्वच्छ धुवायचा. निवडून घ्यायचा आणि मग चिरुन घ्यायचा.  कांदा सोलायचा आणि लांब पातळ काप करायचे. कोथिंबीर निवडायची धुवायची आणि बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि ठेचायच्या. दही छान ताजेच घ्या. जुने आंबट नको. दही चमच्याने ढवळून फेटून घ्यायचे. 

२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालून परतून घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या घालून छान परतायच्या आणि त्यात कांदा घालायचा. कांदा घातला की जरा गुलाबी होऊ द्यायचा मग थोडे हिंग थोडी हळद घालून एक वाफ काढून घ्यायची. त्यात पालक घालायचा आणि पुन्हा वाफ काढून घ्यायची. पालक छान शिजला की त्यात मीठ घालायचे. थोडे लाल तिखट घालायचे. गरम मसाला घाला आणि ढवळून घ्या. सगळं छान शिजलं की गॅस बंद करायचा.

३. गॅस बंद केल्यावरच दही घालायचे आणि कोशिंबीर एकजीव करुन घ्यायची. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळायचे. मस्त गरमागरम भातासोबत खायचे. दही गॅस बंद करुन नंतर दोन मिनिटांनी ओतायचे. जर गॅस चालू असताना दही ओतले तर ते फाटण्याची शक्यता जास्त असते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Easy Spinach Salad: A Nutritious, Diet-Friendly Delight in Minutes!

Web Summary : Prepare a delicious and healthy spinach salad in just ten minutes! This traditional recipe combines spinach, yogurt, and spices for a flavorful side dish that complements roti, bhakri, or rice. Enjoy this diet-friendly and nutritious meal.
टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स