Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरीच करा विकतपेक्षा भारी मऊ घट्ट पनीर अगदी झटपट, विकतचे भेसळ पनीर खाण्याचा धोकाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2026 18:26 IST

Make soft, thick paneer at home, better than store-bought, no risk of eating adulterated paneer : पनीर करताना लक्षात ठेवा या टिप्स.

पनीर घरी करणे अगदी सोपे आहे. विकतचे भेसळयुक्त आणि आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे पनीर घरीच करावे. पनीरची रेसिपी अगदी सोपी आहे. मात्र समस्या एकच असते की पनीरला आकार आणि घट्टपणा येत नाही.  त्यामुळे त्याचे नीट तुकडे करता येत नाहीत आणि भाजी करताना त्याला पाणी सुटते ते चिकटते आणि तुटते. (Make soft, thick paneer at home, better than store-bought, no risk of eating adulterated paneer)खरं तर पनीर तयार करण्याची पद्धत थोडी बदलली तर घरीही बाजारासारखे घट्ट आणि चांगले कापता येईल असे पनीर सहज तयार करता येते. काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर पनीर मऊ आणि एकसंध तयार होते.

पनीर करताना सर्वप्रथम दूध चांगले उकळून घ्यावे. दूध उकळायला लागले की त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळून हळूहळू घाला. दूध फाटल्यानंतर गॅस लगेच बंद करु नका पाणी हिरवे व्हायला लागले की करा. अनेक जण इथेच घाई करतात आणि लगेच ते गाळून घेतात. पण पनीर चांगले तयार व्हावे यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. दूध फाटल्यानंतर ते मिश्रण थोडा वेळ तसेच राहू द्यावे. ते पूर्णपणे उकळत्या अवस्थेत असताना लगेच गाळले तर पनीराचा भुगा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते मिश्रण थोडेसे कोमट होईपर्यंत थांबणे फायद्याचे ठरते.

मिश्रण थोडे गार झाल्यावर ते स्वच्छ मलमलच्या कापडात किंवा सूती कपड्यात गाळावे. त्यानंतर त्यावर थंड पाणी घातल्यास लिंबाची आंबट चव कमी होते आणि पनीरची चव अधिक चांगली राहते. कपड्यातील पाणी चांगले पिळून काढावे आणि पनीरचा गोळा व्यवस्थित एकत्र करुन त्याला चौकोनी किंवा गोल आकार द्यावा. कापडातच ठेवावे. काढण्याची घाई नको.

यानंतर पनीर घट्ट होण्यासाठी त्यावर वजन ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कपड्यात बांधलेले पनीर एखाद्या सपाट पाटावर किंवा ताटात ठेवून त्यावर जड भांडे किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवावे. वजन जास्त असले तरच पनीर सेट होते. साधारण ३० ते ४५ मिनिटे वजन ठेवले तर पनीर चांगले घट्ट बसते. अधिक घट्ट पनीर हवे असल्यास एक तासही वजन ठेवता येते. वेळ पूर्ण झाल्यानंतर कपडा काढयचे की पनीर व्यवस्थित सेट झालेले दिसते. अशा पनीराचे सहज चौकोनी तुकडे करता येतात आणि ते भाजीमध्येही तुटत नाहीत. योग्य पद्धतीने तयार केलेले पनीर मऊ, एकसंध आणि चविष्ट होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Make soft, firm paneer at home, better than store-bought.

Web Summary : Making paneer at home is easy, healthier than store-bought. Key is proper milk boiling, slow curdling with lemon/vinegar, and sufficient weight for firmness. This prevents crumbling during cooking.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीआहार योजना