अनेक फळे आपण आवडीने खातो. चवीला छान आणि आरोग्यासाठीही चांगले असा पदार्थ म्हणजे फळ. गोड खाणं जरी चांगलं नसलं तरी विविध फळे खाणं चांगलंच ठरतं. सफरचंद, केळी, पेरु, पपई अशी फळे आपण नेहमी खातो. असेच एक मस्त फळ म्हणजे चिकू. मस्त मऊ आणि गोडसर असा चिकू आहारात नक्कीच असावा. (Make nutritious Chikushek without adding sugar, This delicious fruit is a treasure trove of vitamins.)त्याचे फायदे अनेक असतात. चिकूमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी हे फळ उपयोगी ठरते. त्याचबरोबर यात नैसर्गिक साखर, फ्रुक्टोज आणि सुक्रोज असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते. थकवा जाणवत असेल किंवा मुलांना - तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा हवी असेल तर चिकू उत्तम पर्याय आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी क्सिडंट्स असतात, या घटकांची शरीराला फार गरज असते. हे ते घटक आहेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखी खनिजेही यात आढळतात, त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास हातभार लागतो. त्वचेसाठीही चिकू फायदेशीर मानला जातो, कारण त्यातील अँटी ऑक्सिडंट्स त्वचेचा नैसर्गिक तजेला टिकवण्यास मदत करतात. वजन वाढवायचे असल्यास चिकूचा आहारात समावेश करणे उपयोगी ठरु शकते, कारण त्यात नैसर्गिक कॅलरीचे प्रमाण चांगले असते.
१. चिकूचा आणखी एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे साखर न घालता केलेला चिकू शेक. पिकलेले चिकू सोलून त्याच्या बिया काढाव्यात. त्याचे तुकडे थंड दुधासोबत मिक्सरमध्ये घालावेत. मस्त पातळ होईपर्यंत मिक्सर फिरवा आणि छान ज्यूस तयार करा. नैसर्गिक गोडीसाठी एक-दोन भिजवलेले खजूर आणि काही बदाम घातल्यास शेक अधिक पौष्टिक होतो. सगळे मिश्रण छान ब्लेंड करुन घ्यावे.
२. आवडत असल्यास थोडी वेलची पूड घालून सुगंध वाढवता येतो. तसेच इतरही सुकामेवा वापरु शकता. साखरेऐवजी गूळ इतर वेळी वारला तरी यासाठी वापरु नका. चिकूचा गोडवा पुरेसा होतो. यात वेगळी साखर घालायची गरज नसते, कारण चिकूची नैसर्गिक गोडी पुरेशी असते. असा शेक सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी उत्तम ठरतो. चव, ऊर्जा आणि पोषण या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजे चिकू आणि त्यापासून केलेला हा साधा पण आरोग्यदायी शेक.
Web Summary : Sapodilla, rich in fiber and natural sugars, aids digestion and boosts energy. Packed with vitamins, minerals, and antioxidants, it strengthens immunity and bones. Enjoy a sugar-free sapodilla shake for a healthy, tasty treat.
Web Summary : चीकू फाइबर और प्राकृतिक शर्करा से भरपूर, पाचन में सहायक और ऊर्जा बढ़ाता है। विटामिन, खनिज और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह प्रतिरक्षा और हड्डियों को मजबूत करता है। स्वस्थ और स्वादिष्ट नाश्ते के लिए चीनी-मुक्त चीकू शेक का आनंद लें।