मसाला चपाती ही साध्या चपातीचा एक चवदार आणि झणझणीत प्रकार आहे, जो नाश्त्यासाठी खास आणि पोटभर पर्याय ठरतो. रोजच्या साध्या चपातीला थोडासा मसाल्याचा ट्विस्ट दिला की तिची चव अगदी वेगळी आणि आकर्षक होते. (Make Masala Chapati in no time, breakfast recipe - great for everyday food, tastes amazing!!)हलक्या मसाल्यांचा सुगंध, मऊसर टेक्स्चर आणि गरमागरम खाल्ल्यावर मिळणारी चव, यामुळे मसाला चपाती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
नाश्त्याच्या वेळी पटकन काहीतरी चविष्ट आणि समाधानकारक खायचं असेल, तर मसाला चपाती हा उत्तम पर्याय आहे. ती खलल्यावर बराच वेळ भूक लागत नाही, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांसाठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठीही ती उपयोगी ठरते. शिवाय, तिच्यासोबत वेगळी भाजी किंवा चटणी नसली तरी ती छान लागते, हे खास वैशिष्ट्य आहे. डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य
जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला, गव्हाचे पीठ, तूप, मीठ, पांढरे तीळ, पाणी, कोथिंबीर
कृती
१. एका परातीत कणीक घ्यायची, त्यात चमचाभर गरम तूप घालायचे. त्यात गरजेनुसार पाणी घालून कणीक मळून घ्यायची. नेहमी पोळीसाठी करता अगदी तसचं पीठ मळायचं. हळूहळू पाणी ओतून मस्त पीठ मळायचे.
२. एका लहान ताटात थोडे तूप घ्यायचे. त्यात लाल तिखट घालायचे. थोडी हळद घालायची. थोडासा पावभाजी मसाला घालायचा. थोडे पांढरे तीळ घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे. त्यात जिरे पूड घालायची आणि धणे पूडही घालायची. कोथिंबीरीची ताजी जुडी आणायची आणि निवडून घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची.
३. मिश्रण एवजीव करायचे. चमच्याने कालवून घ्यायचे. नेहमी प्रमाणे पोळी लाटायची. लाटल्यावर त्याला तयार केलेला मसाला लावायचा. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मग गरम तव्यावर परतून घ्यायची. दोन्ही बाजूंनी खमंग परतायची. मसाल्यातील तूप परतण्यासाठी पुरते. तेल किंवा तूप बाजूले घालायची गरज लागत नाही.
