Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एक थेंबही तेल न वापरता करा चविष्ट - पौष्टिक टोमॅटो सूप , दहा मिनिटांत करा आणि पोटभर प्या

एक थेंबही तेल न वापरता करा चविष्ट - पौष्टिक टोमॅटो सूप , दहा मिनिटांत करा आणि पोटभर प्या

Make delicious and nutritious tomato soup without using a single drop of oil, make it in ten minutes : पौष्टिक आणि चविष्ट टोमॅटो सूप करण्याची रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 16:53 IST2026-01-21T16:50:40+5:302026-01-21T16:53:16+5:30

Make delicious and nutritious tomato soup without using a single drop of oil, make it in ten minutes : पौष्टिक आणि चविष्ट टोमॅटो सूप करण्याची रेसिपी.

Make delicious and nutritious tomato soup without using a single drop of oil, make it in ten minutes | एक थेंबही तेल न वापरता करा चविष्ट - पौष्टिक टोमॅटो सूप , दहा मिनिटांत करा आणि पोटभर प्या

एक थेंबही तेल न वापरता करा चविष्ट - पौष्टिक टोमॅटो सूप , दहा मिनिटांत करा आणि पोटभर प्या

वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये घेता येणारी एक मस्त रेसिपी आहे. दुधी भोपळा आणि टोमॅटोचे सूप हे चवीला मस्त, पचायला सोपे आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. अनेकांना दुधी भोपळ्याची भाजी फारशी आवडत नाही, पण टोमॅटोसोबत त्याचे सूप केल्यावर त्याची चव पूर्णपणे बदलते. टोमॅटोची आंबट-गोड चव दुधी भोपळ्याच्या सौम्य चवीसोबत छान मिसळते आणि सूप चवीला मस्त लागते. या सुपची खासियत म्हणजे यात तेलाचा वापर करण्याची गरजच नसते. (Make delicious and nutritious tomato soup without using a single drop of oil, make it in ten minutes)त्यामुळे हे सूप पोटावर अजिबात जड वाटत नाही. आजकाल अनेक जण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी तेलकट पदार्थ टाळतात. अशा वेळी दुधी भोपळा–टोमॅटो सूप हा एक उत्तम पर्याय ठरतो. तेल नसतानाही सूपला छान नैसर्गिक चव येते. इतरही फार मसाले वापरायची गरज नाही.

दुधी भोपळा पाण्याचे प्रमाण जास्त असलेली भाजी असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. तो पचनासाठी हलका असून पोटातील उष्णता कमी करतो. टोमॅटोमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे हे सूप फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. 

साहित्य 
टोमॅटो, कांदा, लसूण, पाणी, मीठ, मिरी पडू, दुधी भोपळा

कृती
१. टोमॅटोचे लहान तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. दुधी भोपळा सोलायचा आणि त्याचे तुकडे करायचे. एका कुकरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे घ्यायचे. टोमॅटोचे तुकडे घ्यायचे. तसेच दुधीचे तुकडे घ्यायचे. पाणी घालायचे आणि कुकर लावायचा. व्यवस्थित शिजवून घ्यायचे. 

२. कुकर उघडला मिश्रण गार करायचे. गार झाले की सगळे पदार्थ मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्याची पेस्ट तयार करायची. एका कढईत पेस्ट घ्यायची. त्यात थोडे पाणी घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडी मिरी पूड घालून उकळायचे. मस्त गरमागरम प्यायचे.   

Web Title : तेल-मुक्त टमाटर सूप: मिनटों में त्वरित, स्वस्थ और स्वादिष्ट रेसिपी

Web Summary : वजन घटाने के लिए तेल-मुक्त टमाटर और लौकी के सूप का आनंद लें। यह आसानी से पचने वाला सूप टमाटर के खट्टे-मीठे स्वाद को लौकी के हल्केपन के साथ जोड़ता है। पोषक तत्वों और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह मिनटों में तैयार होने वाला एक स्वादिष्ट और पौष्टिक विकल्प है।

Web Title : Oil-Free Tomato Soup: Quick, Healthy, and Delicious Recipe in Minutes

Web Summary : Enjoy a healthy, oil-free tomato and bottle gourd soup, perfect for weight loss. This easy-to-digest soup combines the sweet-sour taste of tomatoes with the mildness of bottle gourd. Rich in nutrients and antioxidants, it's a flavorful and nutritious option ready in minutes.