Join us

पावसाळ्यात करा ताज्या मक्याचं पालक घालून धिरडं!! कुरकुरीत- चविष्ट आणि पौष्टिक, मुलांसाठी खास खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 19:11 IST

Make corn and spinach Chilla during monsoon!! Crunchy- tasty and nutritious, a special dish for kids: मक्याचे दाणे आणि पालकाचा पाला एकत्र करुन करा कमालीचा पदार्थ. मक्याचे धिरडे नक्की खाऊन पाहा.

साहित्य मक्याचे दाणे, पालक, तांदळाचे पीठ, बेसन, आलं, लसूण, कांदा, हिरवी मिरची, हळद, मीठ, तेल, पाणी

कृती१. छान ताजा मका घ्यायचा. मक्याचे दाणे काढून घ्यायचे. बाजारात सोलून ठेवलेले दाणेही मिळतात. ते घेऊन आलात तर उत्तम. काम कमी होईल. (Make corn and spinach Chilla during monsoon!! Crunchy- tasty and nutritious, a special dish for kids)मक्याचे दाणे शिजवायचे. कुकरमध्ये शिजवा किंवा उकळून द्यायचे. दोन्ही चालेल. फक्त जास्त मऊ करु नका. फक्त शिजवून घ्यायचे. जास्त मऊ झाले तर त्याचा लगदा होईल. ते छान कुरकुरीत राहणार नाही. 

२. पालकाची ताजी जुडी घ्या. पालक स्वच्छ धुवायचा. पालकाचा पाला मस्त बारीक चिरायचा. लांब लांब चिरला तरी चालेल. तसेच कांदा सोलायचा आणि कांदा बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे अगदी बारीक पातळ काप तुकडे करायचे. आलं किसून घ्यायचे. 

३. मक्याचे दाणे हाताने किंवा चमच्याने दाबून जरा कुसकरायचे.अगदी लगदा करायचा नाही. तुकडे राहू द्यायचे. थोडे दाणे बाजूला काढायचे आणि ते दाणे सुद्धा मिश्रणात घालायचे. अख्खे दाणे घालायचे. एका खोलगट पातेल्यात मक्याचे दाणे घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. किसलेले आले घालायचे. पालक घालायचा. सगळे पदार्थ एकदा एकजीव करायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची.  ठेचलेली लसूण घालायची. सगळं छान मिक्स करायचं.

४. त्यात थोडे बेसनाचे पीठ घालायचे. तसेच थोडे तांदळाचे पीठ घालायचे. बेसनाचे पीठ घ्याल त्याच्यापेक्षा तांदळाचे पीठ कमी घ्यायचे. तीन ते चार मोठे चमचे बेसनाचे पीठ घ्यायचे. आणि दोन चमचे तांदळाचे पीठ. त्यात थोडे पाणी घालायचे आणि मस्त एकजीव करायचे. अति घट्ट पीठ मळायचे नाही. मात्र अगदी पातळही पीठ करायचे नाही. मध्यम प्रमाणात ठेवायचे.

५. पॅन गरम करत ठेवायचा. पॅन जरा तापल्यावर त्याला तेल लावायचे. त्यावर चमचाभर तयार मिश्रण पसरवायचे. जास्त पातळ नका करु जाडसर गोलाकार आंबोळीसारखे घालायचे. व्यवस्थित कुरकुरीत होऊ द्यायचे. मग उलथायचे आणि दुसर्‍या बाजूने पण छान परतायचे. दोन्हीकडून कुरकुरीत झाल्यावर काढून घ्यायचे. तेला ऐवजी तूप घेऊ शकता.      

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाऊस