Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > विकतपेक्षा भारी चाट मसाला करा घरी, फक्त १० मिनिटांत आंबटगोडतिखट धमाकेदार चाट मसाला तयार

विकतपेक्षा भारी चाट मसाला करा घरी, फक्त १० मिनिटांत आंबटगोडतिखट धमाकेदार चाट मसाला तयार

Make chaat masala at home, very easy recipe, don't buy from outside : चाट मसाला घरीच करा झटपट. सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 16:34 IST2026-04-09T16:30:31+5:302026-04-09T16:34:20+5:30

Make chaat masala at home, very easy recipe, don't buy from outside : चाट मसाला घरीच करा झटपट. सोपी रेसिपी.

Make chaat masala at home, very easy recipe, don't buy from outside | विकतपेक्षा भारी चाट मसाला करा घरी, फक्त १० मिनिटांत आंबटगोडतिखट धमाकेदार चाट मसाला तयार

विकतपेक्षा भारी चाट मसाला करा घरी, फक्त १० मिनिटांत आंबटगोडतिखट धमाकेदार चाट मसाला तयार

आजकाल बाजारात सहज मिळणारा चाट मसाला जवळजवळ प्रत्येक घरात वापरला जातो. फळांवर, सॅलडवर किंवा विविध पदार्थांवर भुरभुरवला की चव लगेच वाढते. पण हा तयार मसाला वापरताना आपण त्याच्या गुणवत्तेकडे फारसं लक्ष देत नाही. (Make chaat masala at home, very easy recipe, don't buy from outside )अशा वेळी घरी केलेला चाट मसाला हा अधिक चविष्ट, सुरक्षित आणि विशेषतः पचनासाठी फायदेशीर ठरतो.

घरी तयार केलेल्या चाट मसाल्यात वापरले जाणारे घटक साधारणपणे जिरे, धणे, काळं मीठ, सैंधव मीठ, आमचूर, सुंठ, मिरी यांसारखे नैसर्गिक आणि पचनास मदत करणारे असतात. हे सगळे पदार्थ आपल्या पारंपरिक आहारात पाचक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा मसाला केवळ चव वाढवत नाही तर अन्न पचवण्यासही मदत करतो. गॅस, अपचन यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. चाट मसाला घरी करणं फारच सोपं आहे. रेसिपी जाणून घ्या. 


साहित्य 
धणे, जिरे, काळीमिरी, ओवा, बडीशेप, पुदिना, आमचूर पावडर, साखर, हिंग, लाल तिखट, काळं मीठ, लवंग   

कृती
१. एका पॅनमध्ये अर्धी वाटीभर धणे घ्यायचे. तसेच अर्धी वाटी जिरे घ्यायचे. दोन्ही पदार्थ मस्त भाजून घ्यायचे. त्यातच पुदिन्याची काही स्वच्छ ताजी पाने भाजून घ्यायची. पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत भाजायची. नंतर चार ते पाच चमचे ओवा घ्यायचा. त्यापेक्षा थोडी जास्त बडीशेप घ्यायची. चार लवंग घ्यायच्या तसेच थोडी काळीमिरी घ्यायची, मसाला मस्त खमंग भाजून घ्यायचा. 

२. सगळे पदार्थ भाजून गार झाले की मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात अगदी चमचाभर साखर घालायची. थोडे हिंग घालायचे. दोन ते चार चमचे आमचूर पावडर घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. थोडं काळं मीठ घालायचं. सगळे पदार्थ एकत्र केल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्याची छान पूड तयार होते. बंद डब्यात साठवून ठेवा. 

Web Title : घर पर 10 मिनट में स्वादिष्ट चाट मसाला बनाएं!

Web Summary : घर का बना चाट मसाला बाजार से बेहतर है। यह जीरा, धनिया जैसे प्राकृतिक तत्वों से पाचन में मदद करता है। मसालों को भूनकर पीसकर स्वादिष्ट पाउडर बनाएं और डिब्बे में रखें।

Web Title : Make flavorful chaat masala at home in 10 minutes!

Web Summary : Homemade chaat masala is healthier and tastier than store-bought. It aids digestion with natural ingredients like cumin, coriander, and black salt. Roasting and grinding spices creates a flavorful powder. Store in airtight container.