Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला करा कोबीचे धिरडे झटपट, कोबीचे कुरकुरीत धिरडे चवीला भारी आणि रेसिपी अगदी सोपी

नाश्त्याला करा कोबीचे धिरडे झटपट, कोबीचे कुरकुरीत धिरडे चवीला भारी आणि रेसिपी अगदी सोपी

Make cabbage chilla for breakfast, crispy cabbage chilla's are rich in flavor and the recipe is very easy : कोबीचे धिरडे करा झटपट. एकदम सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 17:10 IST2026-03-05T17:05:42+5:302026-03-05T17:10:48+5:30

Make cabbage chilla for breakfast, crispy cabbage chilla's are rich in flavor and the recipe is very easy : कोबीचे धिरडे करा झटपट. एकदम सोपी रेसिपी.

Make cabbage chilla for breakfast, crispy cabbage chilla's are rich in flavor and the recipe is very easy. | नाश्त्याला करा कोबीचे धिरडे झटपट, कोबीचे कुरकुरीत धिरडे चवीला भारी आणि रेसिपी अगदी सोपी

नाश्त्याला करा कोबीचे धिरडे झटपट, कोबीचे कुरकुरीत धिरडे चवीला भारी आणि रेसिपी अगदी सोपी

नाश्त्यासाठी विविध पदार्थ आपण करतो त्यापैकी एक प्रकार म्हणजे धिरडं. विविध प्रकारची धिरडी केली जातात. धिरड्याचं वेगळं पीठही केलं जातं. घरोघरी पद्धत वेगळी असते. (Make cabbage chilla for breakfast, crispy cabbage chilla's are rich in flavor and the recipe is very easy.)त्यापैकी एक मस्त पदार्थ म्हणजे कोबीचं धिरडं. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. पटकन होते आणि चवीला भारी लागतं.  

साहित्य 
कोबी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, तांदूळाचे पीठ, तेल, जिरे, कोथिंबीर, पाणी

कृती
१. कोबी स्वच्छ धुवायचा. कोबी पातळ आणि लांब - लांब चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. तसेच टोमॅटो बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची. छान स्वच्छ करायची. बारीक चिरायची. कांदाही सोलायचा आणि लांब- लांब चिरायचा. 

२. एका परातीत चिरलेला कोबी घ्यायचा, त्यात चिरलेला कांदा घालायचा. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. चमचाभर जिरे घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गरम मसाला घालायचा. तसेच मीठही घालायचे. जरा मिक्स करायचे. 

३. गरजेनुसार तांदूळाचे पीठ घालायचे. जास्त घालायचे नाही अगदी फक्त बांधणीपुरते पीठ हवे. चवीनुसार मीठ घालायचे. थोडी रंगाला हळद आणि चवीसाठी लाल तिखट घालायचे. मिक्स करायचे आणि त्यात पाणी घालायचे. पाणी फार जास्त नको. फक्त मिश्रण एकजीव करायचे. 

४. तव्याला तेल लावायचे त्यावर तयार मिश्रण पसरवायचे. छान गोलाकार पसरवा. चमच्याची मदत घ्या. झाकून ठेवा आणि शिजवून घ्या. दोन मिनिटांनी उलथा आणि झाकण न ठेवताच दोन्ही बाजूंनी खमंग परतायचे. छान गरमागरम चहासोबत खायचे. 

Web Title : झटपट पत्ता गोभी चीला रेसिपी: कुरकुरी, स्वादिष्ट नाश्ता!

Web Summary : स्वादिष्ट पत्ता गोभी चीला झटपट नाश्ते के लिए बनाएं। कटी हुई पत्ता गोभी, प्याज, टमाटर, मसाले और चावल का आटा मिलाएं। घी लगी कड़ाही पर फैलाएं और सुनहरा भूरा होने तक पकाएं। गरमागरम परोसें!

Web Title : Quick & Easy Cabbage Chilla Recipe: Crispy, Delicious Breakfast!

Web Summary : Make delicious cabbage chilla for a quick breakfast. Mix chopped cabbage, onion, tomato, spices, and rice flour. Spread on a greased pan and cook until golden brown. Serve hot!