इडली हा पदार्थ भारतात फार प्रसिद्ध आहे. नाश्त्यासाठी अगदी मस्त, पोटभरीचा आणि चविष्ट असतो. विविध प्रकारे इडली करता येते. इडलीसाठी पीठ मात्र रात्रभर भिजवावे लागते. कधी पटकन इडली करायची असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.(Make bread idli in just 10 minutes, no need to soak or ferment dal rice! Light and delicious idli) ब्रेडपासून अशी इडली करता येते. अगदी सोपी रेसिपी आहे. २० मिनिटांत होते. तांदूळ, डाळी, आंबवणे काहीच करायची गरज नाही. फार सोपी कृती आहे. पाहा काय करायचे. नाश्त्यासाठी करा खास पदार्थ.
साहित्य ब्रेड, दही, रवा, पाणी, मीठ, तेल, मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची, आलं, गाजर, कोथिंबीर, इनो
कृती१. पांढरा किंवा ब्राऊन कोणताही ब्रेड घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यातून ब्रेड फिरवून घ्यायचा. त्याचा चुरा करायचा. तो एका खोलगट पातेल्यात घ्यायचा. त्यात वाटीभर रवा घालायचा. जेवढा चुरा त्यानुसारच रवा घ्यायचा. त्यात वाटीभर दही घालायचे. व्यवस्थित फेटून घ्यायचे. त्यात थोडे थोडे पाणी घालायचे. ढवळत राहायचे. जरा छान घट्ट करायचे. इडलीसाठी जसे पीठ करता तसेच पीठ करायचे.
२. गाजर सोलून घ्यायचे. नंतर किसायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. आलंही किसून घ्यायचं. कोथिंबीर निवडायची आणि स्वच्छ धुवायची. नंतर बारीक चिरुन घ्यायची. एका कढईत तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. कडीपत्ता घालायचा. मोहरी तडतडली की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा किस घालायचा. कोथिंबीर घालायची. किसलेले गाजर घालायचे. परतून घ्यायचे.
३. पिठात थोडे इनो घालायचे. चवीपुरते मीठ घालायचे. पीठ छान ढवळून घ्यायचे. तयार केलली फोडणी त्यात घालायची. ढवळायचे आणि छान एकजीव करायचे. इडलीपात्र गरम करायचे. पाणी ओतून स्टीम तयार करायची. मग इडलीपात्राला तेल लावायचे. त्यात इडली लावायची आणि किमान २० मिनिटे तरी वाफवायची. भांड्यानुसार वेळ बदलू शकते. गरमागरम मऊ अशी इडली तयार होते.
Web Summary : Make instant bread idli in minutes! This recipe skips soaking and fermenting. Mix bread crumbs, semolina, yogurt, and spices. Steam for a fluffy, delicious breakfast.
Web Summary : मिनटों में बनाएं झटपट ब्रेड इडली! इस रेसिपी में भिगोने और किण्वन की आवश्यकता नहीं है। ब्रेड के टुकड़े, सूजी, दही और मसाले मिलाएं। एक स्वादिष्ट नाश्ते के लिए भाप लें।